Srikanth First Look: राजकुमार रावचा 'श्रीकांत'मधील फर्स्ट लूक आऊट, कोण आहेत उद्योगपती श्रीकांत बोला?

Srikanth Movie: राजकुमार रावशिवाय या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
Srikanth First Look
Srikanth First LookSaam Tv

Srikanth Aa Raha Hai Sabki Aankhein Kholne Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) बहुप्रतिक्षित 'श्रीकांत' (Srikanth Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून राजकुमार रावच्या चित्रपटाचे एकएक अपडेट्स घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे. हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. राजकुमार रावशिवाय या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील राजकुमार रावचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे.

राजकुमार राव श्रीकांत चित्रपटामध्ये प्रसिद्ध उद्योगपती श्रीकांत बोला यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील राजकुमार रावचा फर्स्ट लूक निर्मात्यांकडून आज शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राजकुमार राव रस्त्यावर पळताना दिसत आहे. या चित्रपटाचे टायटल इंग्रजी आणि ब्रेल लिपीमध्ये लिहिण्यात आले आहे. राजकुमार राव आपल्या अभिनयाने असंही कधीच कोणाला निराश करत नाही. या चित्रपटातील राजकुमार रावचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची वाट पाहत आहेत. (Bollywood News Marathi)

T-Series आणि Chack N Cheese Films ने राजकुमार रावच्या 'श्रीकांत - आ रहा है सबकी आँखे खोलने' चा फर्स्ट लूक आउट केला आहे. या लूकमध्ये राजकुमार राव अगदीच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये 'पापा कहते हैं' या गाण्याचे संगीत ऐकायला मिळत आहे. श्रीकांत चित्रपटाला आधी 'श्री' असे नाव देण्यात आले होते आणि हा चित्रपट 15 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार होता. पण आता तो 10 मे 2024 रोजी रिलीज होणार असून त्याची 'कल्की एडी 2898'शी जबरदस्त टक्कर होणार आहे.

Srikanth First Look
Family Star Public Review: कम्प्लिट फॅमिली एन्टरटेन्मेंट..., 'फॅमिली स्टार' प्रेक्षकांना कसा वाटला?

'श्रीकांत - आ रहा है सबकी आँखे खोलने' या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. हा चित्रपट 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, श्रीकांत बोला हे अंध असताना देखील अमेरिकेत शिकणारे पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी होते. ते एक यशस्वी व्यावसायिक बनून दाखवतात. त्यांनी अंध असूनही आपली स्वप्ने पूर्ण केली आणि बोलंट इंडस्ट्रीज नावाची कंपनी स्थापन केली. श्रीकांत जन्मापासूनच अंध होते आणि त्याचे कुटुंब प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होते. शेतकरी कुटुंबातून आले असताना देखील श्रीकांत यांनी अथक परिश्रम करत प्रसिद्ध व्यावसायिक बनून दाखवले.

Srikanth First Look
शाहिद कपूर -क्रिती सेनॉनचा Teri Baaton Main Aisa Ulijha Jiya ओटीटीवर, कुठे पाहायला मिळणार चित्रपट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com