Devara Part 1 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Devara Part 1 : 'देवरा' चित्रपटात झळकणार मराठमोळी अभिनेत्री, कोणती भूमिका साकारणार?

Marathi Actress : काही दिवसात 'देवरा: पार्ट १' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'देवरा: पार्ट १' (Devara Part 1) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. हा दाक्षिणात्य सुपरस्टार असलेला चित्रपट २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यतून जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) पहिल्यांदा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. याचित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट बिग बजेट सिनेमा आहे.

'देवरा: पार्ट १' या चित्रपटात मराठी अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe ) झळकणार आहे. यासंबंधित श्रुतीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री चित्रपटाचे डबिंग करताना दिसत आहे. श्रुती मराठे हीने या आधी अनेक चित्रपट गाजवले आहेत. तिने मराठी, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये काम केले आहे.

अभिनेत्रीने अलिकडेच 'देवरा: पार्ट १' चित्रपटाच्या डबिंगचे फोटो शेअर केले आहेत. श्रुतीच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटामधून श्रुती टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चाहत्यांनी तर अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'देवरा: पार्ट १' या चित्रपटात तुम्हाला ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. ज्युनियर एनटीआर (Junior NTR) या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात श्रुती मराठे ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका करणार आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे हिला दिग्गज कलाकार ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफी अली खान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. हा चित्रपट ३०० कोटीचा आहे. मराठी कलाकारांचीही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. श्रुती मराठे कायमच आपल्या कामामुळे चर्चेत असते. तिच्या मराठी चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT