Amit Thackeray Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sayali Sanjeev Post: मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचा मनसेला पाठिंबा; अमित ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली..

Amit Thackeray: मनसेकडून माहिम मतदारसंघात ते नशीब अजमावत आहेत. अमित ठाकरेंना मराठी कलाकारांकडून पाठिंबा येण्यास सुरुवात झाली आहे.

Manasvi Choudhary

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. मनसेकडून माहिम मतदारसंघात ते नशीब अजमावत आहेत. अमित ठाकरेंना मराठी कलाकारांकडून पाठिंबा येण्यास सुरुवात झाली आहे. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिचं नाव यामध्ये पहिलं आहे. राज ठाकरे आणि मराठी कलाकारांचे नाते सर्वांनाच माहित आहे, त्यांनी अनेकदा मराठी कलाकारांसाठी ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांचा मुलगा ज्यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरला, त्यावेळी सपोर्टसाठी कलाकार पुढे येत असल्याचे दिसतेय.

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच. सोशल मीडियावर सायली पर्सनल टू प्रोफेशनल सर्वच शेअर करते. कधी सौंदर्याने तर कधी अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्रीने आपलं ठोस मत व्यक्त करत लक्ष वेधून घेतलेय. सायलीने आगामी विधानसभेला मनसेला पाठिंबा देत असल्याची पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

सायलीच्या पोस्टमध्ये नेमकं काय ?

सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या राजकरणाकडे वळताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींचा राजकरणात सक्रिय सहभाग पाहायला मिळतो. अशातच आता सायलीने पोस्ट शेअर केली आहे. सायलीने शेअर केलेला फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांचा आहे. सायलीने फोटो शेअर करत 'मी खूप आनंदी आहे' असं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेकापचे जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरला मिळणार राज्याचा दर्जा? केंद्र सरकार मोठ्या तयारीत; वाचा सविस्तर माहिती

IND vs NZ, 2nd Test, Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, १६ धावांवर टीम इंडियाने गमावली १ विकेट

Maharashtra Election : मोठी बातमी! राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी, नेमकी कुणाला मिळणार?

VIDEO : वडगाव शेरी मतदारसंघात ट्विस्ट; महायुतीत ठिणगी पडणार ?

SCROLL FOR NEXT