Sayali Sanjiv And Ruturaj Gaikwad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sayli Sanjiv: सायलीने ऋतुराजच्या नात्यावर केला खुलासा, 'यामुळे आमच्यात दुरावा…'

सायलीचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत नेहमीच जोडले जाते. मध्यंतरी सायलीच्या एका पोस्टवर ऋतुराजविषयी काही कमेंट करण्यात आल्या होत्या.

Chetan Bodke

Sayli Sanjiv: सध्या एका मराठी अभिनेत्रीने आपल्या पैठणीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सायली संजीव आहे. सायली सध्या तिच्या चित्रपटांमुळे बरीच चर्चेत आहे. दिवाळीनंतर तिचा 'हर हर महादेव' आणि आता 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटानंतर ती बरीच चर्चेत आहे. मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या सायलीने आज चित्रपटसृष्टीत आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

मालिका, चित्रपट, वेब स्टोरीज अशा सर्व माध्यमांत तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. सायली लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायलीच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होत असतात. सायलीचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत नेहमीच जोडले जाते. मध्यंतरी सायलीच्या एका पोस्टवर ऋतुराजविषयी काही कमेंट करण्यात आल्या होत्या.

अखेर याविषयी सायलीने जरा स्पष्टच बोलणे पसंद केले आहे.दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांचा जोर कायम असतानाच आता तिने एक मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत सायलीला ऋतुराजसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे सायलीकडून मिळालेले उत्तर पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

दोघांच्या नात्यावर सायली म्हणते, 'जेव्हापासून आमच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला. आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. सध्या आम्ही मित्रांसारखे बोलूही शकत नाहीत. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जात आहे हे मला ही माहित नव्हते.'

सायली पुढे म्हणते, 'आमच्या दोघांबद्दल चर्चा इथेच थांबली नसून दोघांच्याही वयाबद्दल सर्वत्र चर्चा रंगत होत्या. माझे वय 29 असून ऋतुराजचे वय 25 आहे. आमच्यात आधी विचार विनीमय होते, पण आता काहीच बोलणं होत नाहीत. अशा भावना सायलीने व्यक्त केल्या आहेत. दोघांच्याही नात्यावर सायलीने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या नात्यांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

सायली संजीवने झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ती तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. यानंतर तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देखील केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे स्थान पक्के करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठवे वेतन आयोग आणि जुन्या पेन्शनबाबत महत्वाची अपडेट समोर

Skin Care: उन्हामुळे चेहऱ्याचा ग्लो जाणून पिंपल्स आणि डलनेस वाढलाय? मग या घरगुती फेसमास्कमुळे प्रॉब्लेम्स होतील दूर

Pune Crime: पुणे हादरले! हॉटेलमध्ये तरुणावर कोयत्याने सपासप वार, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

SCROLL FOR NEXT