Akshay Kumar: अक्षय म्हणतो, 'चित्रपट कसे असावे?' चित्रपटाच्या चांगल्या विषयावर केली चर्चा

बॉलिवूडचा डॅशिंग कलाकार आणि अभिनयात परिपक्व असलेला अक्षय कुमार या वर्षात बराच चर्चेत होता. कारण होते, त्याच्या चित्रपटांचे.
Akshay Kumar
Akshay Kumarinstagram @akshaykumar

Akshay Kumar: बॉलिवूडचा डॅशिंग कलाकार आणि अभिनयात परिपक्व असलेला अक्षय कुमार या वर्षात बराच चर्चेत होता. कारण होते, त्याच्या चित्रपटांचे. त्याचे या वर्षात एक नाही दोन नाही पाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. सध्या परदेशात 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' सुरु आहे, या पुरस्कार सोहळ्याला बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. यावेळी अक्षयने तिथून त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल काही घोषणा केल्या आहेत.

Akshay Kumar
BaalBharati Marathi Movie: सिद्धुच्या चित्रपटाला 'या'बॉलिवूड कलाकाराने दिल्या खास शुभेच्छा

यावेळी अक्षय कुमारने 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये माध्यमांना त्याच्या 2 नवीन प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. पहिल्या प्रोजेक्टबाबत त्याने सांगितले की, स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे, प्रोजेक्टचे टायटल बदलण्यात येणार असून पुढील वर्षी शूटिंग सुरू करण्याचे नियोजन आहे. या नव्या कलाकृतीच्या माध्यमातून अक्षय वेब विश्वात पहिले पाऊल टाकत आहे.

Akshay Kumar
Women Bike Rally: भरजरी पैठणी… मराठमोळा साजश्रृंगार करून मुंबईत महिलांची बाईकस्वारी

या वेब सिरीजबद्दल तो म्हणाला, 'ही वेबसीरिज विज्ञानावर आधारित आहे, ज्यामध्ये भरपूर अॅक्शन आहे.' तसेच अक्षयने खुलासा केला की तो लैंगिक शिक्षणावर आधारित चित्रपटासाठी काम करत आहे. हा एक असा विषय आहे ज्यावर त्याला बोलणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो म्हणाला, 'मला सामाजिक विषयांवर चित्रपट करायला आवडतात, जे विशेषतः माझ्या देशातील कोणाच्याही आयुष्यात बदल घडवून आणू शकतात.'

Akshay Kumar
Indian Army Bollywood Movie: नौदल दिनी भारतीय लष्काराचे सामर्थ्य दाखवणारे 'हे' १० चित्रपट, नक्की बघा…

अक्षय कुमार पुढे म्हणाला, 'मी फक्त तेच विषय निवडतो आणि त्यावर चित्रपट बनवतो, पण मी ते अतिशय व्यावसायिक पद्धतीने बनवतो, जिथे गाणी आहेत, कॉमेडी आहे, नाटक आहे आणि शोकांतिका आहे. त्यामुळे मी सत्यकथा घेतो आणि त्याचा अवलंब करतो.

Akshay Kumar
CID Daya: दयाने केले हेअर ट्रान्सप्लांट, चाहत्यांसोबत शेअर केल्या वेदना

सोबतच तो पुढे म्हणतो, जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीला कोविड-19 चा चांगलाच फटका बसला आहे, तेव्हा इथे इंडस्ट्रीला स्मार्ट होऊन प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तो म्हणाला, 'मला वाटतं की आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील, प्रेक्षकांना घराबाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.'

तो म्हणाला, 'ही आमची चूक आहे. त्यांना काय हवे आहे हे आपल्याला कळले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत प्रेक्षकांना दोष देणे बंद करायला पाहिजे, कारण बर्‍याच लोकांनी प्रेक्षकांना दोष दिला आहे आणि त्यांना बाहेर यायचे नाही असे म्हटले आहे, परंतु मला वाटते की त्यांना खूश करण्याची आणि त्यांना बाहेर आणण्यासाठी आता वेळ आली आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com