Sridevi Prasanna Teaser Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sridevi Prasanna Movie: सई-सिद्धार्थची लव्हस्टोरी रुपेरी पडद्यावर फुलणार, 'श्रीदेवी प्रसन्न'चा टीझर रिलीज

Sridevi Prasanna Teaser Out: सिद्धार्थ आणि सईच्या चाहत्यांना त्यांची नवी लव्हस्टोरी पाहायाला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि सई 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या (Sridevi Prasanna Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Sridevi Prasanna Motion Poster Out:

मराठी सिनेसृ्ष्टीची 'बिधनास्त गर्ल' अर्थात अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची लव्हस्टोरी रुपेरी पडद्यावर फुलणार आहे. सिद्धार्थ आणि सईच्या चाहत्यांना त्यांची नवी लव्हस्टोरी पाहायाला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि सई 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या (Sridevi Prasanna Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा हा चित्रपट पुढच्या महिन्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी आणि प्रसन्न या दोघांची कहाणी आहे. टीप्स मराठीचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे.

'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सई-सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवून गेली आहे. विशाल विमल मोढवे दिग्दर्शित 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक चांगलेच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आदिती मोघे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. तर मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत.

'लव एट फर्स्ट साईट' चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न, मॅट्रिमोनी साइटवर 'श्रीदेवी' या नावाच्या उत्सकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही, त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं? या कथानकाला 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांना येत्या २ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT