Sai Tamhankar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar : सही रे सई...! लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीच्या यादीत आघाडीचे स्थान

Sai Tamhankar Achievement :आपल्या अभिनयाने आणि लूकने सई ताम्हणकर कायमच प्रेक्षकांचे मन जिंकत आली आहे. त्याच्या लोकप्रियतेत सतत वाढ होताना दिसत आहे.

Shreya Maskar

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हाणकर (Sai Tamhankar) कायमच तिच्या कामामुळे चर्चेत असते. नुकतीच 'डब्बा कार्टेल' या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. वेब सीरिजमधील आपल्या अभिनयाने तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता सईने अजून एक यश संपादन केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने या आठवड्यातील आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे सध्या सई ताम्हणकरवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. 3 मार्च 2025 रोजी सईची आयएमडीबीवरील लोकप्रिय भारतीय होण्याची इच्छापूर्ती झाली.

'डब्बा कार्टेल' या तिच्या नव्या वेब सीरिजच्या प्रदर्शनानंतर भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत तिने 23वे स्थान प्राप्त केले. ती म्हणाली, "मला महिन्यातून दोनदा आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत येण्याचा आनंद आहे. आयएमडीबी ही अशी गोष्ट आहे ज्याचा मी सतत स्वतः उल्लेख करते आणि हीच गोष्ट केकवरील आयसिंग आहे. प्रेक्षकांच्या प्रेमातून हेच उत्पन्न होते हे समजून घेणे हे खूपच खास आहे."

2024 मध्ये रिलीज झालेल्या 'अग्नि' चित्रपटात देखील सईने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यात तिने प्रतीक गांधी आणि दिव्येंदू शर्मासोबत काम केले आहे. सईने अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. भक्षकमध्ये भूमी पेडणेकर आणि संजय मिश्रा या कलाकारांसोबत काम केले आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरचा सोशल मिडिया मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती कायमच आपल्या लूकसाठी ओळखली जाते. तिने मराठी, हिंदी चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT