Prarthana Behere SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prarthana Behere : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, PHOTO पोस्ट करत म्हणाली...

Prarthana Behere Knee Surgery : मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याची माहिती अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) कायम तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. प्रार्थनाचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतीच प्रार्थनाने सोशल मीडियावर एक पोस्टशेअर केली आहे. प्रार्थनाच्या चाहत्यांनासाठी ही काळजीची बातमी आहे.

प्रार्थना बेहेरेच्या पायाला गंभीर दुखापत (Knee Surgery ) झाली आहे. ज्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना दिली आहे. प्रार्थनाच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. तिने नुकतीच पायाची शस्त्रक्रिया देखील केली आहे. फोटोमध्ये प्रार्थना सोफ्यावर बसलेली पाहायला मिळत आहे. तिच्या पायाला बँडेज लावलेले दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या घराच्या भिंतीवर लावलेले सुंदर फोटो देखील दिसत आहे. ज्यात प्रार्थना आणि तिच्या नवऱ्याचे क्युट क्षणांचे फोटो फ्रेम दिसत आहेत.

प्रार्थना बेहेरे शस्त्रक्रियेनंतर घरी आराम करताना दिसत आहे. तसेच पुढचे काही दिवस ती असाच आराम करणार असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रार्थना बेहेरेने या पोस्टला एक कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "पुढील काही आठवड्यांसाठी माझ्या डोळ्यासमोरचा हा सुंदर व्ह्यू...कोणतीही तक्रार नाही! गुडघ्याच्या शस्त्रक्रिया..." तिच्या या पोस्टवर चाहते आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तिच्यासाठी काळजी दाखवत आहेत. तर ती लवकर बरी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

प्रार्थना बेहेरेचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलिकडेच प्रार्थना 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : भाजप आमदाराचा नवा लूक, नगरपालिकेत यश खेचून आणलं अन्..., वाचा नेमकं काय झालं

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२००० पदांसाठी भरती; अट फक्त १० वी पास; अर्ज कसा करावा?

Mehandi Designs: नवरीच्या पायावर मेहंदी का काढतात?

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT