Prajakta Mali Swades Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Movie: शाहरूख खानसोबत 'तो' सीन करताना घाबरली होती प्राजक्ता, तुम्हाला 'तो' चित्रपट आठवतोय का?

Prajakta Mali Worked with Shah Rukh Khan in Swadesh Movie: प्राजक्ताने तिच्या अभिनयाची सुरूवात मराठीसह हिंदी चित्रपटातून केली आहे. प्राजक्ताने शाहरूख खानसोबत काम केलेला तिचा किस्सा मुलाखतीत सांगितला आहे.

Manasvi Choudhary

हिंदी - मराठीसह संपूर्ण इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी. निरागस भाव आणि दिलखेचक अदा यामुळे प्राजक्ताने लाखोंच्या मनावर राज्य करत आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनयाची सुरूवात मराठीसह हिंदी चित्रपटातून केली आहे. प्राजक्ताने शाहरूख खानसोबत काम केलेला तिचा किस्सा मुलाखतीत सांगितला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. शालेय शिक्षण पूर्ण करत असताना प्राजक्ता नृत्य, नाटके करत होती. लहानपणीच ५००० नाटकस्पर्धांमध्ये प्राजक्ताने सहभाग घेतला. वयाच्या १४ व्या वर्षी सुरूवातीला प्राजक्ताने छोटया पडद्यावर 'क्या मस्ती क्या धूम' या शोमध्ये भाग घेतला होता. या शोची विनर प्राजक्ता ठरली. प्राजक्ताने तिच्या मुलाखतीत मोठ्या पडद्यावरचा तिचा प्रवास सांगताना शाहरूख खानसोबतचा किस्सा सांगितला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता २००४ मध्ये पहिल्यादा मोठ्या पडद्यावर 'स्वदेश' या चित्रपटातून झळकली. या चित्रपटात प्राजक्ताने बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानसोबत काम केले आहे. चित्रपटात प्राजक्ताला शाहरूख खानला धक्का मारण्याचा एक छोटा सीन मिळाला होता. दरम्यान प्राजक्ता घाबरली होती. की बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला धक्का कसा मारायचा? असा प्रश्न प्राजक्ताला पडला असल्याचे तिने सांगितले होते. तो जवळ आला की मा बाजूला व्हायचे. प्राजक्ताने, एक दोन नाहीतर तब्बल १७ वेळा शाहरूख खानला धक्का मारला होता. म्हणजेच तिने १७ वेळा रिटेक घेतला होता. यावेळी शाहरूख खानने तिला बोलावून हा सीन समजावून सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

SCROLL FOR NEXT