Prajakta Mali  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : "मांसाहार हा माणसांसाठी...", प्राजक्ता माळीनं का सोडलं नॉनव्हेज?

Prajakta Mali Talk On Non-Veg : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असते. आता तिने नॉनव्हेज का सोडल्याचे कारण स्पष्ट केले आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाचे आणि नृत्याचे चाहते दिवाने आहेत. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात तिच्या एका वक्तव्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत प्राजक्ताने नॉनव्हेज का सोडलं? याचा खुलासा केला आहे.

एका मिडिया मुलाखतीत प्राजक्ताने सांगितले की, "मी आयुष्यात दोन गोष्टींचे कटाक्षाने पालन करते. एक उत्तम खाणे आणि दुसरे चांगली दिनचर्या फॉलो करणे. आपण जे अन्न खातो, त्याचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे शिळे पदार्थ खाऊ नका. जेवढे ताजे अन्न खाल तेवढे ताजेतवाने रहाल आणि चेहऱ्यावर तजेलदारपणा येईल. रात्री दोन वाजेपर्यंत जागे राहू नये. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. तसेच चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे."

मांसाहाराबाबत प्राजक्ता म्हणाली की," मी शाकाहारी आहे. शरीरात नॉनव्हेज पचण्यासाठी 72 तास लागतात. माणसांची पचनसंस्था वेगळी असते. त्यामुळे शरीरात जवळपास 72 तास मांसाहार राहतो. त्यामुळे अन्न सडते. असे अन्न खाल्ल्यामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर याचा परिणाम होतो. त्यामुळे माझ्या मते नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेले नाही. मी आधी नॉनव्हेज खायचे मग मी नॉनव्हेज खाणे सोडलं. कोणताही पदार्थ खाल्ल्यावर दोन तासांचा गॅप घ्यावा मगच पुढचा पदार्थ खावा. "

व्यायामाचे महत्त्व सांगताना प्राजक्ता म्हणाली," आठवड्यातून किमान तीन वेळा व्यायाम करावा. योगा करावा. मोकळ्या हवेत योग करा. एसीत योगा करू नये. यामुळे चेहरा देखील चांगला होतो. झोपायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर टोनर, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावा. नेहमी कमीत कमी मेकअप करा. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT