Family Man 3 : अखेर मुहूर्त ठरला! मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन ३' कधी येतोय? वाचा अपडेट

The Family Man 3 Release Date: मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरिजच्या रिलीजची मोठी अपडेट समोर आली आहे.
The Family Man 3 Release Date
Family Man 3SAAM TV
Published On

'द फॅमिली मॅन'ची वेबसीरीजची चाहत्यांमध्ये आजही प्रचंड क्रेझ आहे. 'द फॅमिली मॅन'चे दोन सीझन प्रेक्षकांना भरपूर आवडले. प्रेक्षकांनी सीरिजला भरपूर प्रेम दिले. आता चाहते 'द फॅमिली मॅन 3' ची (The Family Man 3) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 'द फॅमिली मॅन 3' रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

'द फॅमिली मॅन' हा ॲक्शन-थ्रिलर ड्रामा आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) पाहायला मिळत आहे. 'द फॅमिली मॅन ३'मध्ये अभिनेता जयदीप अहलावत देखील पाहायला मिळणार आहे. जयदीप अहलावत याला 'पाताल लोक'मुळे खूपच प्रसिद्धी मिळाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'द फॅमिली मॅन ३' 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र अद्यापही 'द फॅमिली मॅन ३' सीरिजची तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. चाहते तारीख जाणून घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'द फॅमिली मॅन'

'द फॅमिली मॅन' सीरिजचा पहिला भाग 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले त्यामुळे 2021 ला 'द फॅमिली मॅन 2' रिलीज झाला. पहिल्या भागात मनोज वाजपेयी यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्रियामणि पाहायला मिळाली. तर साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू दुसऱ्या भागात निगेटिव्ह भूमिकेत झळकली होती. प्रत्येक सीझनला कथेने नवीन वळण घेतले आहे.

The Family Man 3 Release Date
Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबू ईडीच्या रडारवर, २७ एप्रिलला हजर राहण्याचे समन्स, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com