Pooja Sawant Engaged Saam Tv
मनोरंजन बातम्या

'We Are Engaged... म्हणत पूजा सावंतने दिली प्रेमाची कबुली, समुद्र किनारी रोमँटिंक होत मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो केला शेअर

Pooja Sawant Engaged : पूजा सावंतने सोशल मीडियावर तिच्या लाइफ पार्टनरसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूड न्यूज शेअर केली आहे.

Priya More

Actress Pooja Sawant:

मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार एकापाठोपाठ लग्न आणि साखरपुडा करत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Javade) यांनी लग्न केलं. अभिनेत्री मिरा जोशी (Meera Joshi), स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती.

त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आहे. होय खरं आहे पूजा सावंतने सोशल मीडियावर तिच्या लाइफ पार्टनरसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूड न्यूज शेअर केली आहे.

पूजा सावंतने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पूजा सावंतने एका समुद्र किनारी उभं राहून होणाऱ्या नवऱ्याला मिठी मारल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा होणारा नवरा पाठमोरा उभा राहिला असून पूजा कॅमेऱ्याकडे पाहत बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे. पूजा सावंतने हे फोटो पोस्ट करत We are engaged असे म्हटले आहे.

पूजा सावंतने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged', पूजा सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे तीन फोटो पोस्ट केले आहे. पण एकाही फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे पूजाच्या चाहत्यांना तिचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पूजाने देखील तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काहीच सांगितले नाही.

पूजा सावंतच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. त्याचसोबत त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत पूजावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पूजा सावंतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे. पूजाने 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने 'झकास', 'सतरंगी रे', 'पोस्टर बॉईज', 'दगडी चाळ', 'चीटर', 'भेटली तू पुन्हा' आणि 'लपाछपी' यासारख्या चित्रपटात काम केले. तिचे चित्रपट सुपरहिट ठरले असून प्रेक्षकांना देखील खूप आवडले. तसंच पूजाने 'जंगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT