Mrunal Thakur SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mrunal Thakur : 'तू मराठी आहेस का?' चाहत्याच्या प्रश्नावर मृणालचं खास उत्तर, गायले 'हे' गाणं

Mrunal Thakur Song Video : मराठी अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिला एका चाहत्याने 'तू मराठी आहेस का?' असा सोशल मीडियावर प्रश्न विचारता मृणालने भन्नाट उत्तर दिलं आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) बॉलिवूड गाजवले आहे. मृणालने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. अभिनेत्री मृणाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या कामाचे अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.

नुकताच मृणाल ठाकूरने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी ॲनीथिंग' च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावर तिला अनेक चाहत्यांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले. त्यातील एका चाहत्यांनी मृणालला विचारले की, 'तू मराठी आहेस का?' यावर अभिनेत्रीने खूप भन्नाट पद्धतीने उत्तर दिले आहे.

चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देत मृणालने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात मृणाल बहिणीसोबत गाणे गात आहे. हा व्हिडीओ मृणालनेच शूट केल्यामुळे ती व्हिडीओत दिसत नाही. मात्र तिचा आवाज ऐकू येत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मृणालची सहकारी 'जय महाराष्ट्र' बोलते. तेव्हा ती विचारते की आपण मराठी आहोत हे सांगण्यासाठी कोणते गाणे गाऊया. तेवढ्यात मृणालने स्वतःच 'सांग सांग भोलानाथ' हे लहान मुलांचे गाणे गायला सुरूवात केली. व्हिडीओमध्ये गाणे बोलता बोलता मुलींचा डान्स देखील तुम्ही पाहू शकता. यावर शेवटी मृणालची बहीण बोलते की, "पाऊस जाऊ द्या पॅकअप कधी होईल ते सांगा." हे ऐकल्यावर सर्वच हसू लागतात.

mrunal thakur

मृणाल ठाकूरचे इंस्टाग्रामवर तिचे 13.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तिचा फोटोतील अंदाज पाहून चाहते घायाळ होतात. मृणालच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मुंबईत रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर हिंदी बोलण्याची सक्ती, कर्मचाऱ्याची प्रवाशावर दादागिरी; VIDEO

Health Tips: हिवाळ्यात रोज खा मुळा, रोगप्रतिकारक शक्तीसोबत शरीरातील रक्तही वाढेल

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Chapati Health Side Effects: तुम्हीही रात्री चपाती खाताय, तर सावधान...

Healthy Soup: हिवाळा स्पेशल डिश; उत्तम आरोग्यासाठी बनवा 'हे' गरमागरम सूप

SCROLL FOR NEXT