Manava Naik On Mumbai Pollution Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manava Naik On Mumbai Pollution: मराठमोळ्या अभिनेत्रीची डोळ्यात अंजन टाकणारी पोस्ट चर्चेत; हवा प्रदूषणावर मांडलं परखड मत

Chetan Bodke

Manava Naik On Mumbai Pollution

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या हवा प्रदूषणाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. दिवसेंदिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामधील हवा दुषित होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या हवेच्या प्रदूषणाचा फटका फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर, सेलिब्रिटींनाही बसताना दिसत आहे. याच मुद्द्यावर आता मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकने हवा प्रदूषणावरुन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Marathi Actress)

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चेत राहणाऱ्या मनवा नाईकने हवा प्रदूषणावर एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, मुंबईमध्ये वाढत असलेले हवा प्रदूषण, सर्वत्र सुरु असलेले बिल्डिंग कंस्ट्रक्शन असे सर्व मुद्दे तिने आपल्या पोस्टमध्ये नमुद केले आहे. सध्या अभिनेत्रीची ही नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Social Media)

मनवाने एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुरु असलेल्या साईटचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. पोस्ट शेअर करताना कॅप्शन दिले की, "हे पूर्णपणे निराशाजनक आहे. पण वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम साइट्स, ट्रॅफिक आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने मुंबई शहर सर्वात वाईट शहर आहे. धुळींचे थर, इमारतींचे रचले जाणारे हे कुरूप ब्लॉक्स वरच्या बाजूला रचले जात आहेत."

"पायाभूत सुविधांच्या नावाखाली वर्षानुवर्षे खोदकाम केले जाते. गौरवशाली बँडस्टँड, हाजीअली ही ठिकाणं आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. लवकरच रेसकोर्सचाही यामध्ये नंबर लागणार आहे. हे सगळं पाहून मन दुखावलं जात आहे." या सोबतच तिने या पोस्टचा राजकारणासोबत कोणताही संबंध नाही अशी टीपही दिली आहे. मनवाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी तिला या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT