Manasi Naik  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mansi Naik: मानसी नाईक घटस्फोट घेणार? पोस्टमधून व्यक्त केली मनातली सल

मानसी नाईकने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी नक्की बिनसलं आहे असं दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Manasi Naik Life Story: अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या आगामी चित्रपट तसेच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा याच्या वाद झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. यातच मानसी नाईकने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी नक्की बिनसलं आहे असं दिसून येत आहे.

मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दोघेही एकमेकांसोबाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नेहमीच शेअर करत असतात. परंतु मानसी नाईक सध्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल पोस्ट करताना दिसत आहे. तिच्या सर्व पोस्ट या भावनिक आहेत. यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

मानसी नाईक हिने काही वेळापूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने लिहिले आहे की, 'आज मी माझ्या मोबाईल मधल्या काही गोष्टी डिलीट करत होते, तेव्हा प्रत्येक वेळी फोने मला विचारत होता 'are you sure' म्हणजे नक्की ना. मला मोठे आश्चर्य वाटले की एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत, तो इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो. जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वतःला एकदाही विचारत नाही की 'are you sure' नक्की ना.' (Actress)

Manasi Naik Instagram Story

आज मानसीच्या पतीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मानसीने स्टोरी शेअर केली. ज्या स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मानसी या स्टोरीद्वारे तिच्या नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. मानसीने शेअर केलेली हे स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे. तसेच दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत. यामुळे तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. त्यांच्या नात्यावर अजून दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Social Media)

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे १९ जानेवारी, २०२१ रोजी झाले होते. लग्नाच्या आधी दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्यातील दुरावा बरेच दिवस चर्चेत होते. मान्सीच्या या पोस्टने या चर्चेला पुष्टी मिळत आहे. (Marriage)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT