Mansi Naik New Home: प्रसिद्ध नृत्यांगणा मानसी नाईक नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या पोस्टच्या माध्यमातून नेहमीच मानसी चाहत्यांच्या संपर्कात असते. मानसीने नुकतेच अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत तिने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या एका मुहूर्तावर मानसीने नवं घर खरेदी केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत मानसीने ही माहिती दिली आहे.
हिंदू धर्मात वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेचे एक अढळ स्थान आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक लोकं आपल्या शुभ कार्याचा श्री गणेशा करतात. याच शुभ मुहूर्तावर देखील मानसीने नवं घर खरेदी केलं आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घरात पुजा करत गृहप्रवेश केला आहे. नुकताच गृहप्रवेश करताना तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Marathi Actress)
मानसी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना म्हणते, “प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं. जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं, दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं. या रखरखीच्या जगण्यात वावरतांना, उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं. माझी ऊर्जा स्थान बनले, माझे नवीन घर. मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर, संस्कारांची शिदोरी असते एक घर, माझे घर.” अशी पोस्ट करत मानसीने आपल्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. मानसीने नवीन घर घेतल्याबद्दल अनेक चाहत्यांनी तिचं सोशल मीडियावर कौतुक केले आहे. (Entertainment News)
मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तिच्या सोबत तिचे कुटुंबीय दिसत असून ते उंबऱ्यावर उभे राहत कलशाची पुजा करताना दिसते, त्यानंतर पुढे ती नव्या घराच्या दारावर ‘श्री’ लिहीताना दिसत आहे. सध्या मानसीचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. कमेंटच्या माध्यमातून मानसीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांच्या माध्यमातून मानसीला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख मिळाली. एकदम कडक, ढोलकी, मर्डर मिस्त्री, ३ बायका फजिती ऐका आणि अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.