Nalasopara News: समुद्रकिनाऱ्यावर सापडला रहस्यमय कंटेनर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, VIDEO

Unidentified Sea Container: नालासोपाऱ्यातील कळंब समुद्रकिनारी आज सकाळी एक रहस्यमय कंटेनर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस, तटरक्षक दल घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

नालासोपाराच्या कळंब समुद्रकिनारी आज सकाळच्या सुमारास एक रहस्यमय कंटेनर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. HPCU 4 88919 असा क्रमांक असलेला हा कंटेनर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तत्काळ नालासोपारा पोलिसांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी कंटेनरची चौकशी सुरू केली आहे. सद्य:स्थितीत या कंटेनरचे मालक कोण आहेत, तसेच तो कोणत्या कंपनीचा आहे, हे समजू शकलेले नाही.

घटनेची गंभीरता लक्षात घेता अर्नाळा सागरी पोलिस आणि तटरक्षक दलही तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. कंटेनर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, यामध्ये नेमकं काय आहे याबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com