Mokhada News : अफूची बोडांची कारमधून वाहतूक; ८ लाखांचे अफू जप्त, कार सोडून चालक फरार

Palghar News : भरधाव वेगाने जाणारी कारचा संशय आला. यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग सुरु केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून चालकाने कार चिंचुतार गावाजवळ सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पळून गेला
Mokhada News
Mokhada NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 

मोखाडा (पालघर) : अफूच्या फुलांची शेती करून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी अनेक कारवाया झाल्या आहेत. अशात पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अफूच्या सुकलेल्या बोडांची कारमधून वाहतूक केली जात होती. या कारची तपासणी केली असताना त्यात सुकलेली अफूची फुले आढळून आली. पोलिसांनी हा माल जप्त केला असून कार चालक मात्र फरार झाला आहे.   

पालघर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व मोखाडा दरम्यान पोलिसांनी हि कारवाई केली आहे. या मार्गावरून एक भरधाव वेगाने जाणारी कारचा पोलिसांना संशय आला. यामुळे पोलिसांनी या कारचा पाठलाग सुरु केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून कार चालकाने कार चिंचुतार गावाजवळ सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पळून गेला. पोलिसांनी सदर कारची तपासणी केली असता त्यात अफूच्या फुलांनी भरलेल्या गोण्या आढळून आल्या. 

Mokhada News
Tuljapur Crime News : तुळजापूरात खळबळ; मुलासारखे सांभाळले त्यानेच केला घात; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली महिलेची हत्या

कारसह मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी सदर कार मधून ७ लाख ८० हजार ३४० रूपयांचा अफूच्या सुकलेल्या बोंडाचा १११.४२० किलो ग्रॅम वजनाचा चुरा आढळून आला असून हा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच ८ लाखाची कार देखील जप्त केली असून मोखाडा पोलिसांनी ऐकूण १५ लाख ८० हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतकेच नाही तर या कारला दोन बनावट नंबर प्लेट असल्याचे देखील आढळून आले आहे. 

Mokhada News
Nanded : स्मशानभूमीच्या जागेवरून गावकरी आपापसात भिडले; गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यास विरोध

फरार कार चालकाचा शोध सुरु 

दरम्यान फारार कार चालकाचा तपास जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलिस करत आहे. महत्वाचे म्हणजे अफूची शेती ही महाराष्ट्र होत नाही. असे असताना अफूच्या सुकलेल्या बोंड नेमके आले कुठून हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत मोखाडा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com