ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुमचाही लॅपटॉप स्लो चालतोय किंवा हॅंग होतोय तर या सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही लॅपटॉपची स्पीड वाढवू शकता.
लॅपटॉपचा वेग कमी होण्यामागे एक नाही तर अनेक कारणे असू शकतात.
जर लॅपटॉपचा स्पीड स्लो झाला असेल तर हार्ड डिस्क ऐवजी SSD चा वापर करा. कारण हार्ड डिस्कच्या तुलनेत SSD ची स्पीड जास्त असते.
लॅपटॉपमधील कमी रॅम देखील स्लो स्पीडचे कारण आहे. मल्टीटास्किंगसाठी रॅम वाढवा.
लॅपटॉपमधील अनावश्यक फाईल्स आणि प्रोग्रॅम डिलीट करा आण स्टोरेज स्पेस वाढवा.
मालवेअर आणि व्हायरसमुळे देखील लॅपटॉपची स्पीड कमी होते. यासाठी बेस्ट अँटीव्हायरसचा वापर करा.
लॅपटॉपमध्ये temporary files जमा होतात यामुळे लॅपटॉप स्लो होतो. Ctrl+r दाबा, नंतर %temp% लिहून एंटर करा यानंतर टेम्प्रररी फाइल्स उघडतील त्या डिलीट करा.