ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्मार्टफोन दुरुस्तीला देण्याआधी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, स्मार्टफोन दुरुस्तीला देण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या.
दुरुस्तीसाठी देण्यापूर्वी, तुम्ही महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्यावा. कॉनटॅक्टस, फोटो, व्हिडिओ इत्यादींचा बॅकअप घेतल्यानंतर, ते फोन स्टोरेजमधून कायमचे डिलीट करा .
तुम्ही तुमच्या सोशल मीडिया आणि गुगल अकाउंटमधून कोणत्याही परिस्थितीत लॉग आउट केले पाहिजे.
जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा पर्सनल डेटा लीक होण्याची शक्यता आहे .
स्मार्टफोन दुरुस्तीसाठी देण्यापूर्वी, सिम कार्ड काढून टाकणे आवश्यक आहे.
स्मार्टफोनचा IMEI नंबर लक्षात ठेवावा आणि शक्य असल्यास फोन फॅक्टरी रिसेट करावा.
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन दुरुस्तीसाठी देत असाल तर ऑथराइज्ड सेंटर म्हणजेच अधिकृत केंद्रातच जा.