Kranti Redekar New Reality Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kranti Redkar: क्रांती करते निर्मिती क्षेत्रात पदार्पण; रिअॅलिटी शोने वेधले चाहत्यांचे लक्ष

'प्लॅनेट मराठी' पुन्हा एकदा नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'जत्रा' फेम क्रांती रेडकर (Kranti Redkar) लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी' वर पहिलावहिला मराठी रिअॅलिटी शो (Marathi Reality Show) घेऊन येत आहे. नेहमीच काही तरी हटके प्रयोग करणारे 'प्लॅनेट मराठी' पुन्हा एकदा नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून क्रांतीने निर्मीती क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्लॅनेट मराठी सोबत क्रांतीची निर्मिती संस्था 'दॅट हॅप्पी गर्ल' (The Happy Girl) एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. '

प्लॅनेट मराठी'च्या वर्षपूर्ती निमित्त अनेक नवनव्या वेबफिल्म्स, वेबसीरिज सोबत आणखी एका नव्या घोषणेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे ते 'रिअॅलिटी शो'ने. सध्या तरी या हटके प्रयोगाने सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. अद्याप तरी या शो बद्दलची माहिती प्रेक्षकांच्या समोर आलेली नाही. यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. प्लॅनेट मराठी', अ व्हिस्टास कॅपिटल कंपनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण आशय घेऊन येत असते. त्यामुळे हा रिॲलिटी शोही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रथमच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिॲलिटी शो सादर होणार आहे. क्रांती रेडकरच्या सोबतीने हा रिॲलिटी शो आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत. ही संकल्पना खूपच वेगळी असल्याने प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा यासाठी खूप उत्सुक आहोत. लवकरच यातील एकेक पैलू उलगडणार आहेत.''

या शोबद्दल निर्माती क्रांती सांगते, "पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम करताना मला एका चांगल्या ओटीटीसोबत काम करायचे होते. प्लॅनेट मराठी सोबत मी 'रेनबो' चित्रपट केला असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम आहे. त्यामुळे 'प्लॅनेट मराठी' हाच मला योग्य पर्याय वाटला. मुळात 'प्लॅनेट मराठी' हे खूपच दूरदर्शी आहे. प्रेक्षकांची आवड निवड त्यांना व्यवस्थित ठाऊक आहे. या शोच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी'सोबत सुरु झालेला माझा हा नवीन प्रवास नक्कीच अविस्मरणीय असेल. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचणार आहोत. यानिमित्ताने नवोदितांना एक व्यासपीठ प्राप्त करुन देत आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

SCROLL FOR NEXT