Ketaki Chitale Trolled
Ketaki Chitale Trolled Instagram
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale: केतकी चितळे पुणेकरांना काय-काय बोलली?; म्हणाली, तुम्हाला काहीच काय वाटत नाही...

Chetan Bodke

Ketaki Chitale Trolled: मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपल्या अभिनयामुळे नाही तर वादग्रस्त विधानांनी सर्वत्रच चर्चेत असते. तरीही ती सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही होईना पोस्ट शेअर करत असते. पुन्हा एकदा तिच्या पोस्टने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे. गुढीपाडव्यानिमित्ताची केतकीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी नववर्षानिमित्त केतकी चितळे सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत होती. या पोस्टमध्ये तिने थेट पुणेकरांचीच फिरकी घेतली आहे. पण मुख्य बाब म्हणजे तिने ही फिरकी थेट पुण्यातूनच घेतली आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर लागलेत. पण या वेळी बॅनरवर एक चूक झालेली दिसली. त्यावरून केतकी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच बरसलीय.

आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अगदी धुमधडाक्यात, जल्लोषात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. चैतन्याची गुढी उभारत नववर्षाचं स्वागत सर्वजण मोठ्या जल्लोषात करतात. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढत, नागरीक मराठी पोशाख परिधान करुन रस्त्यावर फिरतात. मुंबई, ठाणे आणि पुण्यातील नागरिकांमध्ये या सर्वांची क्रेझ जास्त आहे.

महाराष्ट्रात पुण्यातही मोठ्या थाटामाटात गुढीपाडवा साजरी केली जाते. या पुण्यात सध्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छांची जोरदार बॅनरबाजी केली गेलीय. पण यावेळी पुणेकरांनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा इंग्रजीतून दिल्या आहेत. त्यामुळे केतकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील लोकांना स्वघोषित मावळे म्हणत केतकीनं त्यांना चांगलेच धारवेर धरले आहे.

केतकी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणते, “नमस्कार मी केतकी चितळे, आता मी आहे पुण्यात.. म्हणजेच स्वघोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत.. रस्त्यावर चालताना मला बऱ्याच ठिकाणी ‘हॅप्पी गुढीपाडवा’ असे पोस्टर दिसले. त्यामुळे मला या सगळ्या मावळ्यांना विचारायचं आहे की, आता तुम्ही विसरलात का महाराजांना, त्यांच्या शिकवणीला...”

तर ती पुढे म्हणतो, “की फक्त दादागिरी करताना महाराजांचे नाव वापरुन त्यांचा अपमान करता... आजही नवीन वर्षांच्या ‘हॅप्पी गुढीपाडवा’ अशा शुभेच्छा देताना तुम्हाला काहीच वाटत नाही का... असो... गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...” सध्या तिची ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT