Ranveer Singh: दीपिकामुळे रणवीर सुधारला, सलूनमध्ये जाऊन थेट कचराच उचलला

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. रणवीरचा उद्धाटनादरम्यानचा एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. त्यात त्याने केलेल्या कृतीमुळे कौतुक होतंय.
Deepika Padukone and  Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer Singh Saam Tv

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याची फॅशन नेहमीच सेलिब्रिटीही कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. कधी त्याच्या कपड्यांमुळे तर कधी त्याच्या काही विचित्र कृतींमुळे तो सोशल मीडियावर हमखास ट्रोल होतो. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा उद्धाटनादरम्यानचा एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. त्यात त्याने केलेल्या कृतीमुळे कौतुक होतंय.

Deepika Padukone and  Ranveer Singh
Karan Johar Trolled: ‘ए रमतगमत कुठे चाललाय?...’ विमानतळावर डॉक्युमेंट न दाखवणाऱ्या करणवर नेटकरी संतापले

रणवीर सिंगचा एका उद्धाटनाच्या कार्यक्रमादरम्यान एक अशी कृती केली, ज्यावरुन चाहते त्याला मोठ्या प्रमाणात कमेंट करत कौतुक करीत आहे, तर कोण ट्रोल करीत आहे. रणवीरचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेमक काय आहे, चला तर पाहूया... रणवीर सिंग एका सलूनच्या उद्धाटनाला गेला होता, तेव्हा पासून त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

उद्धाटनाला रणवीरने राखाडी रंगाची पँट आणि काळ्या टी-शर्ट परिधान केला होता. याशिवाय त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा होता. रणवीर सिंग कॅमेरामन्सच्या समोर पोहोचताच त्याला ग्रीन कार्पेटवर काही कचरा दिसला. तो कचरा त्याने पाहताच रणवीर खाली वाकला आणि उचलून पुढे गेला. विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तो बराच चर्चेत आला आहे.

Deepika Padukone and  Ranveer Singh
Pushpa The Rule मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या एन्ट्रीने लागणार चार चाँद; कथेत येणार नवा ट्वीस्ट

रणवीरचा कचरा उचलणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. त्यावर नेटकरी म्हणतात, ‘खूप चांगले काम केले आहेस, असंच काम करत जा.’ असं एक जण म्हणत आहे. तर आणखी एक जण म्हणतो, ‘तुझ्यासारखा सर्वच सेलिब्रिटींनी काम करायला हवं.’ तर आणखी एकाने कमेंटमध्ये दीपिकाच्या नावाचा उल्लेख केला आहे, ‘दीपिका पदुकोणाला स्वच्छता खूप आवडते. तिने अनेकवेळा याबाबत खुलासा केला आहे की ती तिचे घर खूप स्वच्छ ठेवते. आता कदाचित हा तिच्या जीवनशैलीचा भाग झाला असेल.’

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com