Ketaki Chitale  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale: त्या महापुरुषाचे म्हणणं काय आहे?, 2024 ला माझी इच्छा पूर्ण होणार का? असं म्हणत केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Priya More

Ketaki Chitale Instagram Post:

मराठी सिनेसृष्टीची 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपली परखड मतं, वादग्रस्त पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अशामध्ये आता केतकी चितळेने नववर्षाच्या (New Year 2024) पहल्याच दिवशी इन्स्टाग्रामवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. केतकीच्या या पोस्टने (Ketaki Chitale Instagram Post) तिने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. तिने या पोस्टच्या माध्यमातून २०२२ च्या आठवणींना उजाळा देत २०२४ मध्ये माझी ती इच्छा पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

केतकी चितळेला दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यामुळे ती अडचणीत आली होती. आता दोन वर्षानंतर केतकी चितने इन्स्टाग्रामवर नववर्षानिमित्त केलेल्या पोस्टमध्ये २०२२ मध्ये तिच्यावर कशाप्रकारचा अन्याय झाला, तिच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यांच्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. याबाबत केतकीने इन्स्टा पोस्टवर व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा परखड मत मांडले आहे.

केतकीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने असे म्हटले आहे की, 'नमस्कार मी केतकी चितळे, मी हा व्हिडिओ का करते आहे. तर प्रत्येक वर्षी म्हणजे नवीन वर्ष आल्यावर आपल्या प्रत्येकाच्या इच्छा असतात. हे वर्ष असं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तशी माझीही एक इच्छा आहे. तर ती इच्छा काय आहे? १४ मे २०२२ साली मला अटक करण्यात आलं. बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकण्यात आलं हे सर्वांना माहिती आहे. पण पोलिसात जाऊन माझ्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या. माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी दाखल केल्या गेल्या. यात जे कलम अस्तित्वातच नाही ते वापरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.'

'बरं ज्या तक्रारी नोंदवण्यात आल्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या त्याचे एफआयआरही लिहिले. जे सेक्शन १६अ (आयटी) अस्तित्वातच नाही ते लिहिण्यात आले. या सगळ्यात एक व्यक्ती मला २०० ठिकाणी फिरवणार होती. पण ती व्यक्ती फारशी महत्वाची नसल्यामुळे आपण त्याच्याबाबत फारसं काही बोलणार नाही. या सगळ्यात ज्या व्यक्तीच्या नावामुळे, त्यांचे नाव वापरुन मला तुरुंगात टाकण्यात आले त्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे?, त्या महापुरुषाचे म्हणणे काय आहे?, हे ऐकायला आणि जाणून घ्यायला मला आवडेल. याबाबत मी समन्सही पाठवले आहेत. कोर्टात येऊन तुमची बाजू मांडा, असे त्यात म्हटले देखील आहे. घाबरायचं कशाला?, मांडा की स्वत:चे मत.', असे केतकीने म्हटले आहे. केतकीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये '।।जय हिंद।। ।।वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय।।', असे लिहिले आहे.

त्याचसोबत या व्हिडीओच्या शेवटी केतकी म्हणते की, 'असो... २०२४ मध्ये माझी ही इच्छा पूर्ण होईल का?, असा सवाल करत केतकीने आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळेला २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. याप्रकरणी ती ४१ दिवस तुरुंगात होती. शरद पवरांबाबत केलेल्या पोस्टप्रकरणी तिच्याविरोधात राज्यभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. ४१ दिवसांनंतर तिची जामीनावर सुटका झाली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

IND-W vs NZ-W: हरमनप्रीतला राग अनावर; पराभवानंतर या खेळाडूंवर भडकली; सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, कोंढव्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT