Actress Ketaki Chitale Social Media Post: अभिनेत्री केतकी चितळेचं नाव घेतल्याबरोबर आपसुकच डोळ्यासमोर वाद येतोच. अनेकदा केतकीच्या काही विधानांनी किंवा तिच्या पोस्टमुळे वाद झाले आहेत. केतकी अभिनयात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर पोस्ट करत ती लोकांना तिची दाखल घ्यायला भाग पडते.
केतकीला तिचे बोलणे अनेकदा भोवले आहे, एकदा तिला तिच्या वक्तव्यामुळे जेलची हवा देखील खायला लागली आहे. पण कितीही काहीही झालं तरी केतकी तिचं मत मांडतेच. नुकतेच केतकीने एक पोस्ट शेअर केली आहे, बघूया काय म्हटलं आहे केतकीने तिच्या पोस्टमध्ये.
सोशल मीडियावर पोस्टकरत केतकी म्हणते, “तुम्ही धावू शकता, तुम्ही लपू शकता, परंतु तुम्ही नशिबापासून सुटू शकत नाही आणि तुम्हाला भौतिक स्वरूपात पाठवलेला उद्देश पूर्ण/शिकण्यासाठी पूर्ण करू शकत नाही.”
केतकी पुढे तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “तुमचा आत्मा (आत्मा) तुमच्या शरीरात (शव) बंदिस्त आहे. परंतु जो आत्मा आहे ज्याला पाणी पाजले पाहिजे, त्याचं पालनपोषण करायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला हवं आणि आपण आपल्या मागील जीवनात जे शिकलो नाही, हे जाणून घेण्यासाठी स्वतःच्या आत डोकावणे आवश्यक आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर बिंबवलेल्या पाश्चात्य शिकवणींमुळे बहुतेकांचा यावर विश्वास नाही. आपण आपल्या मार्गासाठी मार्गस्थ व्हा... धर्म नव्हे तर स्वतःचा धर्म शिकायला सुरुवात करा. ओम नमः शिवाय” अशा आशयाची पोस्ट केतकीने केली आहे. (Social Media)
नुकतंच काही दिवसांपूर्वी देखील तिने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात केतकीने लव्ह जिहादवर भाष्य केलं होतं. सनातनी हिंदू मुली फक्त आणि फक्त लव्ह जिहादच्या बळी आहेत की स्टॉकहोम सिंड्रोम हा एक दृष्टीकोन आहे. ज्याचा देखील विचार करणे आवश्यक आहे?
केतकी नेहमीच सेशल मीडियावर आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे आणि आक्षेपार्ह विधानांमुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली. आज शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सने तिचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिला ‘ओम नमः शिवाय’ म्हणत तिचे कौतुक करत आहे.
केतकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती ‘आंबट गोड’या मालिकेच्या माध्यमातून ती खूपच प्रसिद्ध झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.