Kadambari Kadam Talks About Not Doing Daily Soap Instagram
मनोरंजन बातम्या

Kadambari Kadam: नाटकातून कादंबरीचं पुन्हा कमबॅक, पण मालिकेत काम न करण्याचा घेतला निर्णय

Kadambari Kadam Interview: कादंबरी कदम ही अनेक मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांना भेटली होती. पण तिने मालिका विश्वातून बऱ्याच वर्षांपूर्वी ब्रेक घेतला होता. तिने पुन्हा नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला यायचा निर्णय घेतला आहे.

Chetan Bodke

Kadambari Kadam Talks About Not Doing Daily Soap: 'तुजविन सख्या रे' म्हणत प्रचंड तरुणाईला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम. कादंबरी अनेक मालिका, सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण तिने काही वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. पण ती पुन्हा नाटकातून कमबॅक करायला सज्ज झाली आहे. कादंबरी कदम ही अनेक मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांना भेटली होती. पण तिने मालिका विश्वातून बऱ्याच वर्षांपूर्वी ब्रेक घेतला होता. तिने पुन्हा नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला यायचा निर्णय घेतला आहे.

कादंबरीने का घेतला ब्रेक?

कादंबरीने तिच्या मुलाला वेळ देण्यासाठी मालिका विश्वाचा निरोप घेतला होता. कांदबरीने आपल्या गरोदरपणातच मालिका विश्वाचा निरोप घेतला. तिने तिच्या मुलाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. आपण या क्षेत्रात अनेक अभिनेत्रींना बाळासोबत घर सांभाळताना दिसतात. पण कांदबरीने मात्र घराला आणि बाळाला वेळ द्यायचा निर्णय घेतला होता. (Marathi Actress)

घर व करिअर सांभाळण हे बहुतेक अभिनेत्रींना जड जातं. पण कादंबरीने मात्र पुर्ण वेळ बाळासोबत घालवला. पण आता ती पुन्हा करिअर आणि बाळ हे आव्हान स्विकारायला तयार आहे. आई झाल्यावर कादंबरीने ब्रेक घेतला होता, त्यावर ती म्हणते की, ब्रेक घेण्यामागचं मातृत्व हे महत्वाचं आणि आनंदी कारण होतं. घरी माझा नवरा आर्थिक बाजू सांभाळत होता. त्यामुळे मला एवढी काळजी नव्हती. (Marathi Theater)

कादंबरीचा सध्या तरी मालिका न करण्याचा निर्णय

अनेक मालिकांमध्ये कादंबरीने महत्तवाच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे ती पुन्हा मालिकांमध्ये दिसणार का? यावर प्रश्न होता. याबद्दल ती म्हणाली की,मालिका करणं हे माझ्यासाठी सोपं आहे असं मला वाटत नाही. मालिकेच्य शुटिंगला सकाळी निघेन तेव्हा माझा मुलगा झोपलेला असेल आणि मी रात्री परत योईन तेव्हाही तो झोपलेलाच असेल. (Entertainment News)

त्यामुळे त्याच्यासोबत वेळ घालवता येणार नाही. मला हे नकोय.कादंबरी पुन्हा एकदा कलाक्षेत्रात कमबॅक करत आहे. ती कोणत्या सिनेमा किंवा मालिकेतून नव्हे तर चारचौघी या नाटकातून कमबॅक करत आहे. (Marathi Film)

स्वत: साठी कसा वेळ काढते कादंबरी?

मी अनेकदा पुस्तक, वही- पेन घेऊन कॉफीशॉप मध्ये जाते, सोशल मीडियावर वेळ घालवते. मुलासोबत वेळ घालवते. मला आवडणाऱ्या गोष्टी मी नेहमी करत असते. असं कादंबरी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT