ZHZB 1st Day Collection: सारा- विकीच्या ‘जरा हटके जरा बचके’ने केली दमदार ओपनिंग, पाहा पहिल्या दिवशीचा आकडा

Vicky Kaushal- Sara Ali Khan Film 1st Day Collection: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चला तर जाणून घेऊया पहिल्याच दिवशी चित्रपटाने कशी कमाई केली...
Zara Hatake Zara Bachake 1st Day Box Office Collection
Zara Hatake Zara Bachake 1st Day Box Office CollectionInstagram

Zara Hatake Zara Bachake 1st Day Box Office Collection: ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट नुकताच २ जूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल आणि सारा अली खान झळकणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगलीच कमाई केली असून चला तर जाणून घेऊया चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या कमाईबद्दल.

Zara Hatake Zara Bachake 1st Day Box Office Collection
Sara Ali Khan Stingy: ‘कोणी हॉटस्पॉट देतं का?...’, इतकी कंजूस की करोडो रुपये कमावून सुद्धा दुसऱ्यांचं इंटरनेट वापरते सारा

चित्रपटात एका मध्यमवर्गीय घरातील कहाणी दाखवण्यात आली असून चित्रपटाचा बजेट देखील फार कमी आहे. विकी कौशल आणि सारा अली खान यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५.५० कोटींची कमाई केली आहे. ही चांगली ओपनिंग मानली जात आहे आणि ट्रेड ॲनालिस्टच्या मते वीकेंडला चित्रपट चांगला कलेक्शन करू शकतो. (Bollywood Film)

चित्रपटाची कथा, इंदूरमधील एक मध्यमवर्गीय परिवाराची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये कपिल चावला (विकी कौशल) आणि सौम्या दुबे (सारा अली खान) लग्न करतात आणि ते दोघेही नोकरी करतात. घर लहान असल्यामुळे त्यांच्या घरी कोण पाहूणे आल्यावर त्यांची प्रायव्हेट स्पेस हिरावून घेतात. शेवटी त्यांना खासगी आयुष्य हवे म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये जाण्याचा विचार केला. पण त्यांचे नाते काही कारणास्तव घटस्फोटापर्यंत जाते. हा चित्रपट विनोदी, रोमँटिक आणि ड्रामॅटिक आहे. (Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com