Jahnavi Killekar saam tv
मनोरंजन बातम्या

Jahnavi Killekar : सूरज चव्हणच्या लग्नानंतर बहिणीची तब्येत बिघडली; जान्हवी किल्लेकरनं रुग्णालयातून शेअर केला फोटो, नेमकं झालं काय?

Jahnavi Killekar Hospitalized : मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची सूरज चव्हणच्या लग्नानंतर अचानक तब्येत बिघडली आहे. सध्या ती रुग्णालयात दाखल आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

गुलीगत किंग सूरज चव्हणचा थाटात लग्न सोहळा पार पडला आहे.

सूरज चव्हणच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरची तब्येत बिघडली.

जान्हवी किल्लेकर रुग्णालयात दाखल आहे.

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणचे थाटामाटात लग्न पार पडले. या लग्नात बिग बॉसमधील अनेक कलाकार दिसले. सूरज चव्हाणची लाडकी बहीण जान्हवी किल्लेकर देखील लग्नाला आली होती. हळदीपासून ते लग्नापर्यंत जान्हवी प्रत्येक समारंभात सूरजच्या सोबत होती. ज्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक झाले. सूरजच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जान्हवी किल्लेकरने सूरजला लग्नात गिफ्ट म्हणून सोन्याची अंगठी दिली.

सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर प्रत्येक कामात पुढे दिसली. तिने आपल्या लाडक्या भावाच्या लग्नात खूप मजा-मस्ती केली. जान्हवी हळद, साखरपुडा या समारंभात तुफान नाचली. बहिणीचे प्रत्येक कर्तव्य ती पार पाडताना दिसली. मात्र आता सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर पोस्ट करून यासंबंधित माहिती चाहत्यांना दिली आहे. जान्हवी किल्लेकर 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' या रुग्णालयात दाखल असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले फोटो शेअर केले आहे. ज्यात ती थकलेली पाहायला मिळत आहे. या पोस्टला जान्हवीने एक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, 'नजर इज रिअल' जान्हवीच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

जान्हवी किल्लेकरचे चाहचे ती लवकरच बरी व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. तिची काळजी घेताना दिसत आहेत. फोटोवर लवकर बरी हो, काळजी घे, नजर लागल्या बघा अशा कमेंट्स येत आहेत. एकंदर सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकरची खूप धावपळ झाली. त्यामुळे तिची तब्येत बिघडली असल्याचे बोले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

Pune : पुण्यातील नामांकित पबमध्ये पोलिसांची धाड! नववर्षाच्या बेकायदा पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ५२ जणांवर गुन्हा दाखल

गौतम भाई आणि प्रीती भाभी.., सुप्रिया सुळेंचे अदानी कुटुंबासाठी गौरवोद्गार|VIDEO

Marathi Actress Arrested: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक; कोट्यवधींची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

Actor Apologised: महिला आयोगासमोर प्रसिद्ध अभिनेत्याने मागितली माफी; महिलांच्या कपड्यांवर केली होती 'ही' अश्लील कमेंट

SCROLL FOR NEXT