Kanni Team Visit Siddhivinayak Temple Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanni Movie: 'कन्नी' यशस्वी व्हावा! हृता दुर्गुळे आणि शुभंकर तावडेने घेतलं सिद्धिविनायकाचे दर्शन, VIDEO व्हायरल

Kanni Team Visit Siddhivinayak Temple: कन्नी चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी या चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायकाचे (Siddhivinayak) दर्शन घेत प्रार्थना केली. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीाडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Hruta Durgule And Shubhankar Tawade:

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) , अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि शुभंकर तावडे (Shubhankar Tawade) सध्या त्यांच्या आगामी 'कन्नी' चित्रपटामुळे (Kanni Movie) चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. कन्नी चित्रपट ८ मार्चला रिलीज होणार आहे. कन्नी चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी या चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायकाचे (Siddhivinayak) दर्शन घेत प्रार्थना केली. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीाडियावर व्हायरल होत आहे.

कन्नी चित्रपटाची टीमने आज प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकला आणि बाप्पाचे दर्शन घेतले. कन्नी रिलीज होण्यापूर्वी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता शुभंकर तावडे यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी हृताने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. तर शुभंकरने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. यावेळी या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत. या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या ८ मार्चला म्हणजे उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, 'कन्नी' चित्रपटामध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतसोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हे सर्वजण मित्र दाखवण्यात आले आहेत. हृताला परदेशामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न असते. या स्वप्नात तिला तिचे जवळचे मित्र किती कन्नी बांधतात हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मराठा आरक्षणाचा जीआर मागे घ्या, अथवा बदल करा, छगन भुजबळांची मागणी

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Chanakya Niti : ही ३ गुपितं कोणालाही सांगू नका; नाहीतर जवळचे मित्रसुद्धा होतील शत्रू

Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT