Hemangi Kavi On Mothers Day  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi On Mother's Day: ‘तिच्यासारखं ५०% सौंदर्य मला मिळालं असतं तर?’; म्हणत हेमांगीने खास आईसाठी लिहिली भावनिक पोस्ट...

नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर आपलं परखड मत मांडणारी हेमांगी सध्या आज मदर्स डे मुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Hemangi Kavi Mother's Day Post: अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच आपल्या अभिनयाने नाही तर, वक्तव्यांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर आपलं परखड मत मांडणारी हेमांगी सध्या आज मदर्स डे मुळे चर्चेत आली आहे.

आज मातृदिन (Mothers Day) निमित्त अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपल्या आईबद्दल पोस्ट लिहीली आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या आईसाठी खास पोस्ट केली आहे. हेमांगीने आईसाठी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

हेमांगी मदर्स डे निमित्त पोस्ट करत म्हणते, “Mummy! जगातली सुंदर स्त्री! प्रत्येकाला असं वाटतं पण माझी आई खरंच सुंदर आहे. तिच्यासारखं ५०% सौंदर्य मला मिळालं असतं तर? पण आपण पडलो पितृमुखी! म्हटलं सौंदर्य नाही तर नाही बाकी गुण तरी घेऊयात. काही गुण अनुवंशिक आलेत काही अथक प्रयत्नांनी आणलेत. तरी ही तुझी सर नाहीच.”

“तुझ्यासारखा त्याग, परिवारासाठी असलेली माया, प्रेम, पप्पांना डोळे झाकून दिलेली साथ, संसारात घेतलेले कष्ट, संपाच्या काळात दाखवलेला संयम, घरात किती भांडणे झाली तरी पाहुणे, नातेवाईक घरी आले की जणू काही झालंच नाही म्हणून केलेलं त्याचं स्वागत, घरात किती ही माणसं आली तरी त्यांच्यासाठी केलेला स्वंयपाक, महीनाआखिरीला पैसे नसले तरी तुझं खंबीर असणं, प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोरी जाणं, व्यवहारज्ञान, तल्लख बुद्धी (माझी आई सातवी पास आहे त्यावेळचं ते मॅट्रिक पास समजलं जायचं आणि नोकरीची offer ही आली होती) ”

“हजरजबाबीपणा, माणसांना ओळखण्याचं कसब! प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात पण तुझ्या बाबतीतले चढ-उतार बघता मला कायम प्रश्न पडतो आणि कुतूहल वाटतं की कसं कसं निभावून नेतेस? आताही! निव्वळ कमाल! आया great असतातच पण तु कायच्या काय great आहेस! म्हणूनच प्रत्येक जन्म तुझ्या पोटी यावा हीच ईच्छा! ” असं म्हणत तिने आपल्या लाडक्या आईबद्दल हेमांगीने मदर्स डे निमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT