Sonalee Kulkarni On Mothers Day: ‘त्या’ रात्री आई होती म्हणून नाहीतर... भररात्रीत सोनालीवर आला होता भयानक प्रसंग.. वाचा सविस्तर

मातृदिन (Mothers Day) निमित्त तिने एका मुलाखतीत तिच्या आईचा आणि तिचा किस्सा सांगितला होता. सोनालीच्या आईने तिचा जीव वाचवला होता, तो क्षण तिने शेअर केला आहे.
Sonalee Kulkarni On Mothers Day
Sonalee Kulkarni On Mothers DayInstagram

Sonalee Kulkarni On Mothers Day Interview: ‘नटरंग’ चित्रपटातून सर्वाधिक फेमस झालेली सोनाली कुलकर्णीने आपल्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या अभिनयाने, विशिष्ट डान्स शैलीमुळे आणि सौंदर्यांमुळे आपल्या चाहत्यांच्या मनावर ती आजही राज्य करते. ‘नटरंग’ चित्रपटातून सर्वाधिक फेमस झालेल्या सोनालीचा लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृदिन (Mothers Day) निमित्त तिने एका मुलाखतीत तिच्या आईचा आणि तिचा किस्सा सांगितला होता. सोनालीच्या आईने तिचा जीव वाचवला होता, तो क्षण तिने शेअर केला आहे.

Sonalee Kulkarni On Mothers Day
Parineeti Raghav Viral Video : बाबो! राघवने इकडे-तिकडे पाहिलं आणि पटकन परिणीतीला...; रोमॅन्टीक Video व्हायरल

सोनालीचे वडिल भारतीय सैन्यदलात होते, सोनालीचा जन्म लष्कराच्या छावणीत झाला आहे. त्यांनी भारतीय सैन्य दलात जवळपास ३० वर्ष नोकरी केली असून त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. सोनालीची आई मुळची पंजाबी असून त्यांचे नाव सविंदर कुलकर्णी आहे.

अभिनयक्षेत्रात आपली छाप पाडण्यासाठी सोनालीने मुंबई गाठली. ऑडिशन देण्यासाठी आलेल्या सोनालीला घरी परतण्यासाठी रात्री फार उशीर झाला होता. नशीब खराब म्हणून की काय, पुण्याला परतत असताना वाटेतच तिची गाडीच मध्ये बंद पडली. त्यावेळी तिचं मुंबईत घर नव्हतं. रात्रीचे बारा ते साडेबाराच्या सुमारास सोनालीची वाशी टोल नाक्याजवळ येताच गाडी बंद पडली. जवळपास एक-दीड तास खटाटोप करुनहा गाडी काय सुरू होण्याचं नाव घेत नव्हती. तितक्यात एका ट्र्क ड्रॉयव्हरने त्यांची देवासारखी येऊन मदत केली.

Sonalee Kulkarni On Mothers Day
Bhaurao Karhade Interview: 'जे झालं चुकीचं होतं...'; मराठी प्रेक्षकां'बाबत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी केलं मोठं वक्तव्य

त्यानंतर रस्त्यात आम्ही एका ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभी केली होती. पुढच्या प्रवासाला निघणार तितक्यात एका चोरट्याने दोन्हीही महिला गाडीत पाहून त्याने गाडीवर उडी घेतली. त्याचं ते कृत्य पाहून सोनाली प्रचंड घाबरली होती. पण तिची आई न डगमगता, हिंमत न हरता, त्या व्यक्तीसोबत सामना केला.

सोनाली म्हणते, “त्या वेळी आईच्या डोळ्यात तिला वेगळीच आग दिसली. ती घाबरली नाही आणि तिने ताबडतोब गाडी फुल स्पीडमध्ये सुरू केली. काहीही झालं तरी गाडी थांबणार नाही असं म्हणतच तिने गाडी पळवली.” तो माणूस त्यांच्या गाडीच्या पाठी थोडावेळ धावला देखील पण काही अंतरावर जाताच तो पडला. केवळ आईने दाखवलेल्या हिंमतीमुळे आणि जिद्दीमुळे आम्ही तेव्हा वाचलो. नाहीतर अशा प्रसंगात घाबरून चुकीचे निर्णय घेणाऱ्या अनेक महिला आपल्याला दिसतात. त्यावेळी फक्त आईमुळे आम्ही सुखरूप वाचलो असं म्हणत तिने मातृदिन (Mothers Day) निमित्त आईच्या धाडसाला सलाम केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com