Hemangi Kavi On Ravindra Berde Instagram
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi On Ravindra Berde: ‘रविंद्र बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट...’; हेमांगी कवीने शेअर केल्या रविंद्र बेर्डे यांच्या आठवणी

Chetan Bodke

Hemangi Kavi On Ravindra Berde

मराठी सिनेसृष्टीमध्ये खलनायकाच्या भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या रविंद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून रविंद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यांवर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी पहाटे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने रविंद्र बेर्डे यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या दोघांनीही 'धुडगूस' या चित्रपटामध्ये एकत्रित काम केले आहे.

हा चित्रपट २००८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये हेमांगीने मुलीचे आणि रवींद्र बेर्डे यांनी वडीलांचे पात्र साकारले आहे. हेमांगीने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चित्रपटातला एक सीन शेअर केला आहे. हेमांगी कवी पोस्टमध्ये म्हणते, "रविंद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोहोचले. २००८ साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भुमिकांमध्ये पाहिलं होतं. पण धुडगूस मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल. हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे."

"यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सगळं काहीही न बोलता अगदी मोजक्या expressions मध्ये दाखवणं खुप कठीण असतं जे त्यांनी सहजगत्या केलं होतं. मला आठवतंय हे सगळं one take मध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं! माझं तरी निघतं! ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर screen share करायला मिळणं खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी! We will Miss u!" अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT