मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi Post: हेमांगी कवीच स्वप्न सत्यात उतरलं; रंगभूमीच्या 'पंढरीत' सादरीकरणानंतर अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

Hemangi Kavi Performance:

Pooja Dange

Hemangi Kavi At Royal Opera Mumbai:

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हेमांगी परखडपणे तिची मते मांडत असते.

हेमांगीने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने तिच्या पंढरीचे वर्णन आणि अनुभव शेअर केला आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

हेमांगी कवीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'खरंतर भक्ताला कुठलंही देऊळ सारखंच! इतर अनेक ठिकाणी त्याने विठ्ठलाची मूर्ती पाहीलेली असली तरीही ‘आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं’ ही इच्छा तो मनी बाळगतोच!

तसंच माझंही होतं. मला कुठल्याही नाट्यगृहात प्रयोग करायला आवडतंच पण ‘साला एकदा तरी या रॅायल ॲापेरामध्ये प्रयोग करायचाय यार’ ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती!

आणि… काल मुंबईच्या रॅायल ॲापेरा हाऊसमध्ये आमच्या ‘जन्मवारी’ नाटकाचा रॅायल प्रयोग झाल्यामुळे माझी ही पण इच्छा पूर्ण झाली!

खरंच नावाप्रमाणे सगळा रॅायल कारभार. नाट्यगृहाचं इंटिरिअर, लाईटस, डेकॉरम, ग्रीनरूम, त्यातलं फर्निचर, स्वच्छता, कॉरिडॉर्स, रंगसंगती, साऊंड सिस्टम, भव्य दिव्यपणा! आहाहा! क्या बात है. सगळंच विलक्षण! एखाद्या राजमहालात आलोय की काय असंच वाटत होतं! इतक्या वर्षांपासून फक्त इतरांकडून या वास्तूचं कौतुक ऐकत आलेय, कुणाकुणाच्या फोटोमध्ये पाहत आलेय पण काल मी चक्कं त्या वास्तूमध्ये उभं राहून प्रयोग सादर केला!

अनेक वेळा मी या नाट्यगृहाला बाहेरून बघितलंय पण कायमच ‘आतून हे कसं असेल’ याचं कुतूहल वाटत आलंय.

म्हणजे रीतसर तिकीट काढून प्रेक्षक म्हणून नाट्यगृह नक्कीच बघता आलं असतं पण आपण ठहरे कलाकार!!! “आत पाऊल ठेवेन ते माझ्या नाटकाचा प्रयोग करायलाच”!!! या खुळ्या निग्रहामुळे खूप वर्ष वाट पाहावी लागली खरंतर मला. पण ते वाट पाहणं वर्थ होतं असंच वाटलं! अनेक दिवस वारीत चालून झाल्यावर जेव्हा पंढरपूरात पाऊल पडतं तेव्हा जे त्या भक्ताचं होत असेल तेच माझं ही झालं! धन्य धन्य!

माझा हा निग्रह पुर्ण करण्याची आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली ते ‘नाट्यधारा’ नाट्यमहोत्सवामुळे.

संपूर्ण भारतातून काही नाटकांची निवड केली होती त्यात ‘जन्मवारी’ नाटक निवडल्याबद्दल नाट्यधारा निवड समीतीचे आणि अनेक वर्षांपासून रंगभूमीची ज्या मनापासून जोपासना करतायेत असे आमचे रवी मिश्रा सर यांचे खूप खूप धन्यवाद!'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT