Gautami Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या 'घुंगरू'चे पोस्टर लाँच, राज्यातील १०० चित्रपटगृहात 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ghungroo Movie Poster Released: हा चित्रपट राज्यातील १०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक बाबा गायकवाड यांनी‌ आज पंढरपुरमध्ये दिली.

Priya More

Gautami Patil Ghungroo Movie:

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याच्या तालावर नाचायला लावणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटीलचा 'घुंगरू' चित्रपट येत्या 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट राज्यातील १०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक बाबा गायकवाड यांनी‌ आज पंढरपुरमध्ये दिली. या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या घुंगरू चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच करण्यात आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गौतमी पाटीलची प्रमुख भूमिका असलेला 'घुंगरू'चित्रपट एकाच दिवशी राज्यातील १०० चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वतः गौतमी पाटील आणि इतर कलाकार 6 डिसेंबरपासून राज्यभरात फिरणार आहेत. लोककला केंद्र, तमाशा आणि स्टेज शोमध्ये नृत्य करणाऱ्या महिला कलाकरांची पडद्यामागणी सत्य कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे चित्रिकरण महाराष्ट्रासह पंजाब, केरळ, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश या सहा राज्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या सहा भाषांमध्ये तयार करण्यात येणार असल्याचे माहिती देखील बाबा गायकवाड यांनी दिली आहे. गौतमी पाटीलचा पहिलाच मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Gautami Patil Ghungroo Movie

दरम्यान, आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांनी पहिल्या आहेत. पण आता गौतमीचा अभिनय देखील तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रचंड वाढली होती ते या चित्रपटाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा येत्या १५ डिसेंबरला संपणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT