Manva Naik Vishwas Nangare Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manva Naik: मनवा नाईकच्या मदतीला धावून आले मुंबई पोलीस, विश्वास नांगरे पाटील यांची कमेंट चर्चेत

"मुंबई शहरात रात्री- मध्यरात्री अनेक मुलींना-महिलांना घराबाहेर पडावे लागते. मुलींनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे."

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी ओळख मिळविलेल्या मनवा नाईकसोबत (Manava Naik) एका कॅब चालकाने गैरवर्तन केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. याविषयी मानव हिने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. २४ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला अटक केली आहे आणि कारही जप्त केली आहे. मनवाच्या या पोस्टवर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कमेंट केली होती.

मानवाने फेसबुकवर पोस्ट शेअर करत घडलेल्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन केले आहे. तिने ट्विटरला देखील ट्विट करून हा सगळा प्रकार लोकांपर्यंत पोचवला आहे. त्या पोस्टमध्ये मानवाने मुंबई पोलिसांना देखील टॅग केले होते. त्यावर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी कमेंट केली होती. "मनवा जी... आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. डीसीपी झोन ८ यावर काम करत आहे. या चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल", असे विश्वास नांगरे पाटील यांनी कमेंटमध्ये लिहिले होते.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत मनवा म्हणाली, "विश्वास नांगरे पाटील हे नेहमीच माझ्या मदतीला धावून आले आहेत." मी काल ट्वीट केल्यानंतर लगेचच मला मुंबई पोलिसांचा फोन आला. त्यांनी माझ्याकडे विचारणा केली. त्यानंतर लगेचच कॅब चालकावर कारवाईदेखील केली. मुंबई पोलीस (Mumbai Police) हे खूप सक्रिय आहेत. तसेच हे शहरदेखील खूप सुरक्षित आहे."

"माझ्यासोबत काल घडलेली घटना फार क्वचित घडते. पण अशी घटना घडायला नको यासाठी नागरिक म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. आयुष्यात कधीतरी अशी एखादी घटना घडते. अशावेळी त्या गोष्टीचा सामना करणे गरजेचे आहे. मुंबई शहरात रात्री- मध्यरात्री अनेक मुलींना-महिलांना घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे मुलींनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच ओला-उबरसारख्या अॅपने नोकरीसाठी चालकांची निवड करताना त्यांचा योग्य तो पाठपुरावा करायला हवा. त्यांची वैयक्तिक माहिती तपासून घ्यायला हवी. त्याबरोबर नागरिक म्हणून आपणही जबाबदारीने वागले पाहिजे. म्हणजे एखादी उबर बुक करताना त्याचा जो चालक आहे. तो आपल्या अॅपवरचा चेहरा आहे का हे बघायला हवे. तसेच प्रवासादरम्यान लाईव्ह लोकेशन कुटुंबियांसोबत शेअर करावे", असेही मनवाने सांगितले आहे.

मनवा नाईकच्या या पोस्टनंतर वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि गाडीही जप्त करण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांत त्याला अटक करण्यात आली. हा कॅब चालक मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra weather : राज्यात गारठा वाढला, हुडहुडी वाढली, किमान तापमान १० अंशांखाली

Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

SCROLL FOR NEXT