Aarya Ambekar Song Choru Chorun Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Choru Chorun Song: आर्या आंबेकरकडून चाहत्यांना व्हेलेंटाईन डे गिफ्ट, 'चोरू चोरून' गाण्याला चाहत्यांकडून पसंती

Aarya Ambekar Song Choru Chorun Released: दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली' या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं.

Priya More

Choru Chorun Song Released:

व्हेलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजे प्रेमाचा दिवस. तर या प्रेमदिवसाचं औचित्य साधतं ‘फतवा’ सिनेमातील ‘चोरू चोरून’ गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत यांचं 'चोरू चोरून' फिमेल वर्जन गाणं (Choru Chorun Song) नुकतच प्रदर्शित झालं आहे. 'दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली' या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. लाखो चाहत्यांनी यावर व्हिडीओ स्वरूपात रील्स बनवल्या होत्या. रसिक प्रेक्षकांनी हे गाणं अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्याचं गाण्याचं फिमेल वर्जन गायिका आर्या आंबेकरच्या (Aarya Ambekar) सुमधूर आवाजात आपल्या भेटीला आलं आहे.

'चोरू चोरून' गाण्याचं संगीत दिग्दर्शन संजीव - दर्शन यांनी केले असून आकर्षक गीतरचना डॉ. विनायक पवार यांनी लिहिली आहे. या गाण्यात अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्याच्या आवाजातील हे गाणं आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

प्रतिक गौतम या गाण्याविषयी सांगितले की, 'फतवा चित्रपटातून मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. तसंच मी त्यात मुख्य अभिनेताही होतो. विशेष म्हणजे 'चोरू चोरून' गाण्यातील 'एका वाघाची शिकार एका हरणीने केली' या शब्दामुळे हे गाणं संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर उचलून घेतलं. भारतातचं नाही तर अगदी जागतिक स्तरावर मला या गाण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. परदेशातून रील्स, मीम्स, कमेंट्सचा जणू पाऊस पडत होता.'

प्रतिकने पुढे सांगितले की, 'मला दररोज मेसेज यायचे की याचं फिमेल वर्जन आलं पाहिजे. तर मी विचार केला. या गोष्टीचं उत्तर द्यायला हवं. की वाघाची शिकार एका हरणीने केली तर आता पुढे कायं? त्यामुळे मी ठरवलं की आपण याचं एक फिमेल वर्जन करूया. कारण जर हे गाणं प्रेक्षकांना इतकं हवहवंस वाटत आहे तर माझी ही जबाबदारी आहे की हे गाणं नायिकेच्या बाजूने देखिल मांडलं पाहिजे.'

तसंच, 'या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात आधीच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील आणि दुसरं म्हणजे हे गाणं आर्याने गायलं आहे. हे गाणं अतिशय सुंदर तयार झालं आहे. आर्या आंबेकरने खूप गोड गायलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्धसुद्धा सुरेख केलं आहे. या गाण्याला संजीव - दर्शन यांचं संगीत आहे. सर्व कानसेन रसिक प्रेक्षकांना हे गाणं अगदी भावेल याची मला खात्री आहे. तसंच मी भविष्यात उत्तमोत्तम चित्रपट आणि नवी गाणी आणण्याचा प्रयत्न करेन.', असे आश्वासन यावेळी प्रतिकने दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आता नाही द्यावे लागणार ₹१२५, मोफत होणार आधार अपडेट, UIDAI चा मोठा निर्णय

Diwali Decoration Ideas: फुलांच्या माळा आणि रंगीत लाइट्सने दिवाळीनिमित्त करा घराची सजावट, कमीत कमी पैशांत होईल झगमगाट

Devendra Fadnavis: शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांची फी माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही|VIDEO

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Hair Loss In Females: महिलांमध्ये वाढत्या केसगळतीमागचं खरं कारण उघड! ‘या’ 6 गोष्टींची कमतरता ठरते धोकादायक

SCROLL FOR NEXT