Amruta Subhash Dream Come True At Filmfare Awards Saam Tv
मनोरंजन बातम्या

Filmfare Awards 2024: निमित्त ठरलं फिल्मफेअरचं, अमृता सुभाषचं स्वप्न पूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Amruta Subhash News: मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचं फिल्मफेअर अवॉर्ड्समुळे एक स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत, स्वप्न सत्यात उतरल्याची माहिती दिली.

Chetan Bodke

Amruta Subhash Dream Come True At Filmfare Awards

69 व्या फिल्मफेअर अवॉर्डची (69th Filmfare Awards) सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. नुकताच गुजरातच्या गांधीनगर मध्ये 69 वा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. दोन दिवसांचा हा अवॉर्ड सोहळा खूपच धुमधडाक्यामध्ये पार पडला.

रविवारी संध्याकाळी म्हणजेच २९ जानेवारीला फिल्मफेअर अवॉर्ड्सचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाइलमध्ये हजेरी लावली. यावेळी मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिने ही या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्याने अमृताचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. (Bollywood News)

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमृता सुभाषचा फिल्मफेअर निमित्त स्वप्न सत्यात उतरल्याचं सांगितलं आहे. (Bollywood Actress)

अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, "फिल्मफेअरने मला अनेक मौल्यवान क्षण भेट म्हणून दिले आहेत. या रंगमंचाने अनेक सेलिब्रिटींचे स्वप्ने साकार केले आहेत. लहान असताना जेव्हा शबानजींची अनेक कामं डोळ्यात प्राण आणून पाहिली, ज्याचं 'मंडी' मधलं पात्र पाहून, त्यात त्यांनी घेतलेला बोलण्याचा लहेजा, त्या भूमिकेसाठी त्यांनी वाढवलेलं वजन, बदललेली देहबोली हे पाहून मी थक्क झाले होते त्यांना पुरस्कार देण्याची मोलाची संधी फिल्मफेअरनं मला दिली याबद्दल मी कृतज्ञ आहे." (Social Media)

"जी स्वप्नं आपण पाहतो ती सत्यात उतरली की आनंद होतो. पण ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केली नव्हती ते जेव्हा असं सत्यात उतरतं तेव्हा शब्द मुके होऊन जातात. त्या शब्दातील अनुभवाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न मी त्या प्रसंगी जे बोलले त्यात केला. ह्या प्रसंगी मी नसलेली ही साडी माझी मैत्रीण आणि एक सच्ची कलाकार अश्विनी गिरीनं मला भेट दिली आहे. अश्विनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातली माझी सिनिअर. तिनं माझ्या कामाचं कौतुक म्हणून दिलेली ही साडी या सुंदर प्रसंगी नेसता आली याचा आनंद वेगळाच! कार्यक्रम गुजरात मधे होता म्हणून खास गुजराती स्टाइल मधे..."

अमृताने फिल्मफेअरमधील शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अमृता सुभाषच्या हस्ते सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार शबाना आझमींना मिळाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT