Marathi Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट, ८ वर्षांचा संसार मोडला

Marathi Actress Divorce : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने आपला घटस्फोट झाल्याचे पहिल्यांदाच सांगितले.

Shreya Maskar

मराठमोळ्या अभिनेत्रीचा घटस्फोट

८ वर्षांचा संसार मोडला

अभिनेत्रीचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अक्षया गुरवने वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री अक्षया गुरवने २०१७ मध्ये भूषण वाणीसोबत लग्नगाठ बांधली. नुकत्याच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की, जवळपास ८ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. मुलाखतीत अक्षया गुरवने सांगितल्याप्रमाणे, "जेव्हा पहिल्यांदा ही बातमी समोर आली तेव्हा माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मला हे सर्व आवडलं नाही. पण जे काही लोकांनी वाचलंय तर हो! ही गोष्ट खरी आहे...मात्र आजही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. पुढे-मागे जर अशी वेळ आली, तर एकत्र काम करायला मला आणि त्यालाही आवडेल."

प्रेमाबद्दल बोलताना अक्षया म्हणाली की, "प्रेमात माणसाने नेहमी नि:स्वार्थी असावे...त्यामुळे कोणाला आपल्या आयुष्यातून निघून जायचे असेल तर जाऊ द्यावे. त्याला थांबवण्यात काहीही अर्थ नाही.मैत्री असो, कुटुंब असो किंवा नवरा-बायकोचं नातं..."

आयुष्याला नवीन संधी देण्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, "एखादं नातं बिघडलं म्हणून तुमच्या आयुष्यात पुन्हा तेच होईल असं नाही. माझा लग्न संस्थेवर अजूनही विश्वास आहे. मला एक मुलगी हवी आहे. मला संसार करायचा आहे. आयुष्यात मला अशी व्यक्ती हवी आहे जिला मी सर्व सांगू शकते. आयुष्यात एखादी गोष्ट घडून गेली म्हणजे परत तेच होईल असं नाही. मी आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहते. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT