Marathi Actress Launch New Brand SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Actress Launch New Brand : मराठमोळ्या अभिनेत्रींनी सुरू केला व्यवसाय, पहिल्या १०० फॉलोवर्ससाठी दिली भन्नाट ऑफर

Aishwarya Narkar Suruchi Adarkar & Titeeksha Tawade Business Women : मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांनी नुकताच स्वतःचा नवीन ब्रँड लाँच केला आहे. तिघी मैत्रींनी बिझनेसवुमन झाल्या आहेत.

Shreya Maskar

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रींनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर बिझनेसवुमन झाल्या आहेत.

अभिनेत्रींनी नवीन ब्रँड लाँच केला आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीनी आता बिझनेसवुमन झाल्या आहेत. आजवर अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawade) , सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar ) यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या तीन मैत्रिणींनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. याचा खास पोस्ट यांनी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांनी मिळून एक क्लोथिंग ब्रँड लाँच केला आहे.

ब्रँडचे नाव काय?

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यातून त्यांनी आपल्या नवीन व्यवसायाची सर्व माहिती चाहत्यांना दिली आहे. तिघांनी देखील सुंदर साड्या नेसल्या आहेत. तिघी देखील खूपच गोड दिसत आहे. त्यांची मैत्री या व्हिडीओतून घट्ट असल्याचे दिसत आहे. ऐश्वर्या-तितीक्षा-सुरुचीच्या नव्याकोऱ्या ब्रँडचे नाव 'थ्रेड अँड ठुमका By Tasvi' ( Thread & Thumka by Tasvi) असे आहे. यात तुम्हाला सुंदर साड्या पाहायला मिळणार आहेत. या व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिले आहे. तसेच त्यांनी पहिली ऑफर देखील सांगितली आहे.

ऐश्वर्या-तितीक्षा-सुरुची पोस्ट

"आम्ही आज 'थ्रेड अँड ठुमका By Tasvi' हा ब्रँड लाँच करत आहोत. सुंदरता आणि भरपूर देसी ग्लॅमसाठी आमच्यासोबत तयार रहा...आत्ताच आम्हाला फॉलो करा आणि 10% सूटचा मिळवा...आमच्या पहिल्या 100 फॉलोअर्ससाठी खास...खास लाँच किंमतीत स्वतःला सुंदर पाहण्याची संधी गमावू नका. आम्ही तुमच्यासाठी फ्रेश आणि आकर्षक रंगांचे कलेक्शन घेऊन आलो आहोत. सॉफ्ट पेस्टलपासून ते बोल्ड फेस्टिव्ह टोनपर्यंत, प्रत्येक शेड काळजीपूर्वक निवडली जाते जेणेकरून प्रत्येक मूड आणि क्षणाला पूरक ठरेल."

वर्कफ्रंट

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर आणि तितीक्षा तावडे एकत्र आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. तर सुरुची अडारकरला 'का रे दुरावा' मधून खूप लोकप्रियता मिळाली आहे. सध्या या तिघांवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून प्रेमाचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death : ड्युटीवर असताना छातीत दुखू लागलं, पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Shreya Bugde: लाल साडीत खुलून दिसतेय श्रेया बुगडे

Viral Video: बाईई काय हा प्रकार! लॅपटॉपवर बनवल्या पुऱ्या, महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रताच्या दिवशी 'या' गोष्टी दान करा, मिळेल दुप्पट पुण्यफळ

Paneer Chilli: रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT