
मराठी मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या नेहमीच विविध पोस्ट शेअर करतात. डान्स,फिटनेस, ब्यूटी टिप्सविषयी त्या नेहमीच चाहत्यांना सल्ला देतात. आतादेखील त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी खास श्रावण स्पेशल अळुवडी कशी बनवायची ही रेसिपी सांगितली आहे.
ऐश्वर्या नारकर यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्या नेहमीच चाहत्यांना विविध अपडेट देतात. विविध फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ अळुवडीची रेसिपी सांगितली आहे.
सर्वप्रथम वडीच्या अळुचे देठ काढून पानांच्या शिरांवर लाटण्याने फिरवून घ्या.
त्यानंतर चिंच आणि गुळाचा पोळ तयार करून घ्या.
अळुच्या वडी मिश्रणासाठी तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ देखील वापरू शकता.
मुगाची डाळीमध्ये थोडेसे तांदळीचे पीठ मिक्स केल्यास अळुवड्या खुसखुशीत होतील.
एका भांड्यामध्ये मुगाचे पीठ, तांदूळ पीठ, हळद, मसाला, जिरे पावडर, मीठ, चिंच- गुळाचा पोळ आणि पाणी हे मिश्रण एकत्र करा.
मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
नंतर अळुच्या एका पानांला सारण लावून दुसऱ्या पानाला देखील सारण लावून अळूची पाने दुमडून त्याचे उंडे तयार करा.
सारण लावलेले अळुचे उंडे कुकरमध्ये उकडून घ्या. उकडलेले उंडेच्या बारीक वड्या तयार करून त्या कढईत तेलामध्ये तळून घ्या.