Circuit Teaser Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

'वेड'नंतर पुन्हा मराठीत साऊथचा रिमेक, हृता- वैभवच्या 'Circuit'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीने केली खास भूमिका

आकाश पेंढारकर दिग्दर्शित 'सर्किट' या चित्रपटाची प्रस्तुती मधुर भांडारकर करत असून, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात झळकणार आहे.

Chetan Bodke

Circuit Teaser Out: "चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३", "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन" अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीमध्ये पदार्पण करत आहेत. आकाश पेंढारकर दिग्दर्शित 'सर्किट' या चित्रपटाची प्रस्तुती मधुर भांडारकर करत असून, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात झळकणार आहे.

भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

"कच्चा लिंबू", "होम स्वीट होम", "मस्का", "भेटली तू पुन्हा", "पावनखिंड" अशा अनेक चित्रपटांची प्रस्तुती तर "चोरीचा मामला" या चित्रपटाची निर्मिती आकाश पेंढारकर यांनी केली आहे. त्यापुढे जात आता "सर्किट" या चित्रपटाद्वारे तो आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत.

वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी या दोघांनीही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.अभिनेता रमेश परदेशी याची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे. रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ "सर्किट" या चित्रपटात झाल्याचं आपल्याला टीजरमध्ये पाहता येतं.

त्यामुळेच चित्रपटाच्या कथेविषयी आणि चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडी यांची आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून शब्बीर नाईक यांनी काम पाहिले असून संकलन दिनेश पुजारी यांचे आहे,तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीबाबत निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले, की गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी जवळून पाहिली आहे. मी हिंदी चित्रपटात कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाची निर्मिती-प्रस्तुती करण्याची इच्छा होती. ती संधी मला "सर्किट" या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT