Swapnil joshi Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil joshi: म्हणून स्वामींचं महत्त्व खूप आहे... मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी स्वामींच्या भक्तीत दंग

Swapnil Joshi Share Video : मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी हा आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर नुकताच स्वामी समर्थ यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Swapnil Joshi Share Video Of Swami Samarth:

मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी हा आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर नुकताच स्वामी समर्थ यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. काल म्हणजेच १० एप्रिलला स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा झाला. यानिमित्त स्वप्नील जोशी स्वामींचा जप करत असल्याचे दिसत आहे.

अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी भक्त आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याने त्याचा सोशल मीडिया वर स्वामी समर्थ यांचा एक मन प्रसन्न करणारा व्हिडिओ पोस्ट केला यातून स्वप्नील स्वामींचा निस्सीम भक्त आहे हे दिसून येते. स्वप्नीलसोबत त्याचे कुटुंबिय सगळेच स्वामींचे भक्त आहे आणि त्याची ही भक्ती या व्हिडिओ मधून दिसून येते. (Latest News)

सध्या स्वप्नील त्याचा निर्मिती असलेला " नाच गं घुमा " चित्रपट प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. स्वप्नील कामाच्या सोबतीने वैयक्तिक आयुष्य देखील तितक्याच चोखरित्या त्यांचा समतोल साधून काम करतोय. ही तारेवरची कसरत करत स्वप्नील 2024 वर्षात नवनवीन प्रोजेक्ट्स करण्यासाठी जोरदार तयारी करतोय.

स्वप्नील या बद्दल बोलताना म्हणतो " स्वामींचं माझ्या आयुष्यात खूप जवळच स्थान आहे. स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असच कायम ते आपल्या सगळ्यांचं पाठीशी भक्कमपणे उभे आहे. स्वामीच स्मरण हे खूप सकारात्मक ऊर्जा देऊन जात आणि म्हणून किती ही कामात असलो कितीही अडचणी आल्या तरी स्वामी कायम सोबत आहे ही भावना मनात असते. कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वामीच बोलावणं आलं की अक्कलकोट ची वाट दिसते स्वामीच सुंदर दर्शन होतं आणि यातून अजून जास्त काम करण्याची प्रेरणा मिळते"

स्वप्नीलची भक्ती ही सगळ्यांनी पाहिली आहे. काम आणि घर दोन्ही गोष्टीची योग्य सांगड घालून स्वप्नील सगळचं उत्तमपणे निभावून घेतोय. 2024 वर्ष हे त्याच्या साठी खूप जास्त खास आहे कारण तो अभिनयाच्या सोबतीने निर्माता सुद्धा झाला आहे आणि आगामी काळात तो अनेक मनोरंजन प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT