Alibaba Aani Chalishitale Chor First Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

चाळीशी लागलेल्या डोळ्यांत जेव्हा फुलतात विशीतली स्वप्नं..., 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर'मधील पहिलं गाणं आऊट

Saala Character Song Release: 'साला कॅरेक्टर' हे गाणं (Saala Character Song) शाल्मली खोलगडेने आपल्या जबरदस्त आवाजामध्ये गायलं आहे. हे गाणं वैभव जोशी यांनी लिहिले आहे. तर अजित परब यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

Priya More

Alibaba Aani Chalishitale Chor:

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) यांच्या आगामी चित्रपट 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर'मधील पहिलं गाणं रिलीज झाले आहे. 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' या चित्रपटाच्या पोस्टर, टीझरनंतर आता 'साला कॅरेक्टर' हे पहिलं गाणं आऊट झाले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे.

'साला कॅरेक्टर' हे गाणं (Saala Character Song) शाल्मली खोलगडेने आपल्या जबरदस्त आवाजामध्ये गायलं आहे. हे गाणं वैभव जोशी यांनी लिहिले आहे. तर अजित परब यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. मस्तीने भरलेल्या या गाण्याला 'चाळीशी'तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर दिसत आहे. या गाण्यामध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांनी खूपच धम्माल आणि मजामस्ती केल्याचे दिसत आहे.

युट्युबवर हे गाणं शेअर करत कॅप्शनमध्ये 'चाळीशी लागलेल्या डोळ्यांत जेव्हा फुलतात विशीतली स्वप्नं...मन स्वत:लाच समजावतं, थोडा टाईट थोडा लूज साला कॅरॅक्टर.' असे लिहिले आहेत. 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' हा चित्रपट येत्या २९ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितले की,'साला कॅरेक्टर' हे गाणं करताना ते सर्व वयोगटातल्या लोकांना सहज गुणगुणता यावं आणि नाचता यावं असा विचार होता ज्याला अजित परब आणि वैभव जोशी या दोन्ही अवलियांनी पुरेपूर न्याय दिला आहे. गाण्यावरून चित्रपटात काय धमाल येईल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.'

दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे हे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये या 'चाळीशी'तल्या चोरांचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी २९ मार्चला हा चित्रपट पाहावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT