Subodh Bhave Film Sangeet Manapmaan Motion Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangeet Manapmaan Motion Poster: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘संगीत मानापमान’चा मोशन पोस्टर रिलीज, सुबोध भावेची पहिली झलक पाहिलीत का ?

Subodh Bhave Sangeet Manapmaan Film: मराठी चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या सुबोधने नुकतंच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज केलेला आहे.

Chetan Bodke

Subodh Bhave Film Sangeet Manapmaan Motion Poster

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. मराठी चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या सुबोधने नुकतंच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज केलेला आहे. ‘संगीत मानापमान’ या संगीतमय चित्रपटातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

२०१५ मध्ये रिलीज झालेला ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर ‘संगीत मानापमान’ या संगीतमय चित्रपटाची अभिनेत्याने गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. आता नुकतंच अभिनेत्याने चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज केला असून रिलीज डेटही जाहीर केली आहे.. (Marathi Film)

आपल्या पोस्टमध्ये अभिनेता सुबोध भावे म्हणतो, "गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना "संगीत मानापमान"च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा... येत्या दिवाळीत सजणार... मराठी परंपरेचा साज... मनामनात गुंजणार... सुरेल गीतांचा आवाज... 'संगीत मानापमान' १ नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!" (Social Media)

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, सुबोध भावेचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच चित्रपटाची भव्यताही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे साकारणार असून, ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मी वसंतराव’नंतर ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Film Industry)

चित्रपटाच्या शुटिंगला सप्टेंबर २०२३ पासून सुरूवात झाली होती. अखेर जानेवारी २०२४मध्ये ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं आहे. तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

SCROLL FOR NEXT