Katyar Kaljat Ghusali In Subodh Bhave  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave: आगामी वर्षात श्रोत्यांसाठी सुबोधकडून सांगीतिक नजराना

'कट्यार काळजात घुसली' चित्रपट प्रदर्शित होऊन १२ नोव्हेंबरला एकूण ७ वर्ष पूर्ण झाले. त्याचेच निमित्त साधत सुबोधने पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Subodh Bhave New Film Announce: अभिनेता सुबोध भावे आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांमध्ये बराच चर्चेत आहे. त्याचा उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार आशय असणारा चित्रपट या दोन समीकरणांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेला आहे. नुकताच सुबोध भावेचा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'हर हर महादेव' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. सुबोध भावे नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याच अभिनयाच्या शैलीत सुबोधने ते पात्र अधिक विशेष आणि दमदार बनवण्याचा तो प्रयत्न करत असतो.

गेल्या ७ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटामुळे सुबोध चांगलाच प्रकाशझोतात आला होता. २०१७ साली संगीत मैफल रंगवणारा हा चित्रपट प्रदर्शित होऊन श्रोत्यांच्या मनावर चांगले घर करुन गेला. चित्रपटातील गाण्यांमुळे हल्लीच्या तरुण पिढीला नाट्यसंगीत ऐकण्याची किंवा शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड निर्माण झाली. आजही सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्ग चित्रपट त्याच आवडीने पाहतात. चित्रपट प्रदर्शित होऊन १२ नोव्हेंबरला एकूण ७ वर्ष पूर्ण झाले.

त्याचेच निमित्त साधत सुबोधने पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट मराठी रंगभुमीवर आधारित असून त्याच नाटकावर आधारित तो चित्रपट होता. नाट्यप्रेमींनीही त्या नाटकाला चांगलाच प्रतिसाद दिला होता. नाटकाप्रमाणेच चित्रपटसुद्धा तितक्याच उत्कृष्ट दर्जाचा बनला होता. सुबोध भावेच्या आयुष्यातील हा खुप महत्वाचा चित्रपट मानला जातो. त्याने या चित्रपटात मुख्य भुमिका केली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे.

सुबोधने 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाला ७ वर्ष पुर्ण झाल्याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत लिहिले की, " 'कट्यार काळजात घुसली' १२ नोव्हेंबर २०१५... एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष. संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं! अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद…" सुबोधच्या या पोस्टमुळे सर्वचजण आनंदी झाले. "

'कट्यार काळजात घुसली' या मराठी चित्रपटाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलेलं पहायला मिळालं. 12 नोव्हेंबर 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. चित्रपटातील संगीत श्रोते आवर्जुन ऐकतात.

या चित्रपटाने शास्त्रीय संगीताची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी देखील तो डोक्यावर घेतला. हा चित्रपट मराठी रंगभूमीवर गाजलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकावर आधारित होता. या नाटकाला आणि चित्रपटाला प्रेक्षकांनी चार चॉंद लावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT