Box Office Released: बॉक्स ऑफिसवर कोण राज्य करणार? अल्लुचा पुष्पा की शाहरुखचा डंकी, एकच दिवशी सिनेमागृहात होणार प्रदर्शित

अल्लु अर्जुनचा 'पुष्पा' आणि शाहरुख खानचा 'डंकी' एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Pushpa: The Rule And Dunki Will Release On Same Day
Pushpa: The Rule And Dunki Will Release On Same DaySaam Tv

Upcoming Films: सुपरहिट चित्रपट 'पुष्पा द राइज'चा सिक्वेल असलेल्या 'पुष्पा द रुल'च्या शूटिंगसाठी चित्रपटाचे संपूर्ण युनिट परदेशी रवाना झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण यावेळी भारतातील जंगलात होणार नसून परदेशात होणार आहे. 'पुष्पा द रुल' हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. तर त्याच दिवशी शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

'पुष्पा द रुल' या चित्रपटाविषयी तेलगू चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनच्या या पहिल्या हिंदी डब चित्रपटाने उत्तर भारतीय राज्यांमध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण केला. त्याचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. फक्त हिंदीत 100 कोटींहून अधिक गल्ला जमावणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि त्याचा मुहूर्त शूट करण्यात आला आहे. या चित्रपटाचे पहिले लाँग शेड्युल आता रविवारपासून सुरू होणार आहे.

Pushpa: The Rule And Dunki Will Release On Same Day
Joyland Movie: प्रदर्शनापुर्वीच पाकिस्तानी सिनेमा ऑस्करमध्ये, तरीही चित्रपटावर बंदी; वाचा सविस्तर कारण

'पुष्पा द रुल' चित्रपटाच्या पहिल्या 15 दिवसांचे शूटिंग थायलंडची राजधानी बँकॉक येथे होणार आहे. थायलंडच्या जंगलात होणार्‍या शूटसाठी या चित्रपटाचे संपूर्ण युनिट तेथे पोहोचले आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनसाठी टीमने रात्रंदिवस मेहनत करून त्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. (Movie)

दक्षिण आफ्रिकेत एका लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन थेट बँकॉकला पोहोचल्याची माहिती चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिली आहे. या शेड्यूलमध्ये चित्रपटातील इतर स्टार्सही सहभागी होऊ शकतात. 'पुष्पा द रुल' या चित्रपटाच्या शूटिंगबाबतची सर्व कामे अल्लू अर्जुनच्या देखरेखीखाली होत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंग वेग आला आहे. (Allu Arjun)

'KGF 2' या कन्नड चित्रपटाच्या यशानंतर 'पुष्पा द रुल' चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनी कथेत काही बदल केले आहेत. 'KGF 2'ला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हे कठीण असल्याचे दिसत आहे. 'पुष्पा द रुल' चित्रपटाचे चित्रीकरण खूप मोठ्या स्तरावर करण्याचा सुकुमार यांचा मानस आहे. संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​डीएसपी देखील यावेळी त्यांच्या मागील चित्रपटातील सुपरहिट गाण्यांच्या पलीकडे जाऊन काही नवीन प्रयोग करणार आहेत.

'पुष्पा द रुल' चित्रपटाचे शूटिंग रविवारपासून बँकॉकमध्ये सुरू होत आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या चित्रपटाच्या टीमला पुढील वर्षी ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे टार्गेट दिल्याचे समोर आले आहे. त्यानुसार चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनचेही नियोजन करण्यात आले आहे. असे झाल्यास, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहरुख खानसाठी हे मोठे आव्हान असणार आहे. कारण त्याच आठवड्यात त्याचा राज कुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' प्रदर्शित होणार आहे. (Shah Rukh Khan)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com