Siddharth Jadhav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav: सिद्धार्थने केला दादा कोंडकेंचा लूक; 'चाहते पाहताच म्हणतात...'

सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या व्हिडिओत सिद्धार्थने दादा कोंडकेंचा लूक परिधान केला असून त्यांचा अभिनय केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी चर्चेत असते. तो नेहमीच हटक्या अंदाजातले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याची स्टाईल कॉपी करण्यासाठी चाहते नेहमीच तयार असतात. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतले.

शेअर केलेल्या व्हिडिओत (Viral Video) सिद्धार्थने दादा कोंडकेंचा लूक परिधान केला असून त्यांचा अभिनय केला आहे. त्या व्हिडिओत दादा कोंडकेंचे (Dada Kondake) लोकप्रिय गाणे 'ढगाला लागली कळं' हे गाणे गायले आहे. सोबतच व्हिडिओच्या बॅकग्राऊंडलाही तेच गाणे लावले आहे. या व्हिडिओमुळे सिद्धार्थ खूपच चर्चेत आला आहे.

'क्या बात है, दादाची आठवण करुन दिलीस, खूप छान अभिनय केलाय, खुप दिवसांनी दादांची आठवण आली सिद्धार्थ भाऊ, 1 नंबर लय भारी कडक भावा, जबरदस्त लईच भारी राव', अशा अनेक कमेंट सिद्धार्थच्या या व्हिडीओला येत आहेत. सोबतच सिद्धार्थचे भरभरुन कौतुक होताना दिसत आहे.

सिद्धार्थ नुकताच तमाशा लाईव्ह, दे धक्का 2 या चित्रपटात दिसला होता. आता लवकरच सिद्धू आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे नाव ' गांधी टॉक्स' असून तो मूकपट आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ जाधव, विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी हे कलाकार दिसणार आहेत. 'गांधी टॉक्स' या चित्रपटाचं दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर यांनी केलं आहे. हा एक डार्क कॉमेडी असेल असे टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. चित्रपटात फक्त हावभावातच अभिनय केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT