Shashank Ketkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shashank Ketkar : शशांक केतकरनं नवीन वर्षात दिली गुडन्यूज, सोशल मिडिया पोस्टनं वेधलं लक्ष

Shashank Ketkar Pregnancy Announcement: मराठी अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षात चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहीला आहे. त्याने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. शशांक केतकर नवीन वर्षात एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शशांक केतकरसाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे.

अभिनेता शशांक केतकर नवीन वर्षात दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याने सोशल मिडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. शशांकने पत्नी प्रियंकासोबतचे फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोंमध्ये शशांकची पत्नी बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. यांनी खूप भन्नाट फोटोशूट केले आहे.

प्रियंका 2025 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. शशांकने या पोस्टला खूप हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, " २०२५ च स्वागत या पेक्षा छान बातमीनं हाऊच शकत नाही.आम्ही पुन्हा एकदा आई बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत... " शशांकच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

शशांक केतकरने आजवर अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्याची 'होणार सून मी या घरची' ही मालिका खूप गाजली होती. मालिकेतील 'श्री' ची भूमिका चाहत्यांना खूप आवडली. सध्या शशांक 'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शशांक केतकरचा मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT