Sayaji Shinde News Saam tv
मनोरंजन बातम्या

Sayaji Shinde's Statement:...म्हणून मराठी सिनेमात काम करण्याचा विचार केला नव्हता; सयाजी शिंदे असे का म्हणाले?

Sayaji Shinde News : सयाजी शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत नागणे

Pandharpur News : मनोरंजन सृष्टीवर आता दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा वाढत चालला आहे. गेल्या काही काळात 'पुष्पा', 'केजीएफ-२', 'कांतारा', 'आरआरआर' या सिनेमांनी देशात दमदार कमाई केली. देशातील अनेक भागातील लोक दाक्षिणात्य सिनेमे पाहण्यास पसंती दर्शवत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील मराठी, हिंदीप्रमाणे अनेक दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. याचदरम्यान, सयाजी शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीवर मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

'घर बिर्याणी बंदूक' या मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेते सयाजी शिंदे पंढरपुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठीत दर्जेदार दिग्दर्शक आणि लेखकांचा वाणवा असल्याची खंत बोलून दाखवली. सयाजी शिंदे म्हणाले, 'मराठी सिनेसृष्टीत प्रतिभावंत लेखक आणि दिग्दर्शक येत नसल्याने आतापर्यंत मराठी सिनेमात काम करण्याचा विचार केला नव्हता, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

नेहमी दाक्षिणात्य चित्रपटात पाहायला मिळणारे सयाजी शिंदे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहेत, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, 'मराठीत चांगले व दर्जेदार चित्रपट बनवले जात नाहीत. त्यामुळे आतापर्यंत फार मी मराठीत काम करु शकलो नाही'.

'मराठी चित्रपटांसाठी चांगले व दर्जेदार दिग्दर्शक आणि लेखकांची आवश्यकता आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली तर मला मराठी चित्रपटांमध्ये (Marathi Movie) काम करण्यासाठी नक्की आवडेल',असेही ते म्हणाले.

'नागराज मंजुळे यांनी 'घर बिर्याणी बंदुक' हा मराठी सिनेमा बनवला आहे. यामध्ये माझी प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापीत करेल, असा विश्वासही अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री सायली पाटील, आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.

'घर बंदूक बिर्यानी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच सयाजी शिंदे यांचा 'घर बंदूक बिर्यानी' सिनेमा हा झी स्टुडिओज निर्मित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे एक नव्या रूपात दिसणार आहेत. त्यांची ही भूमिका प्रेक्षक किती पसंत करतात हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्याला कळेल.

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिर्यानी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे (Sayaji Shinde) , नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: माणुसकी कुठे मेली, ट्रेनमध्ये कुत्र्याला बांधलं अन् मालक फरार झाला, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Vande Bharat Express : पावसाचा फटका वंदे भारत एक्सप्रेसलाही, सोलापूर-मुंबई वंदे भारत रद्द, वाचा सविस्तर

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Rekha Gupta : भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारणारा आरोपी कोण? गुजरातसोबत आहे कनेक्शन

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT