Saorabh Choughule SAAM TV
मनोरंजन बातम्या

Maha Kumbh 2025 : मराठमोळा अभिनेता थेट पोहचला कुंभमेळ्यात; गंगेत केलं स्नान, पाहा VIDEO

Saorabh Choughule Attend Kumbh Mela : मराठी अभिनेता सौरभ चौगुले याने कुंभमेळ्याला भेट दिली आहे. आपला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याच्या या खास क्षणांची झलक पाहा.

Shreya Maskar

महाकुंभमेळा (Maha Kumbh 2025) काल (13 जानेवारी) पासून सुरू झाला आहे. हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे. महाकुंभमेळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. येथे सर्व सामन्यांपासून मोठे कलाकारही गंगेत स्नान करायला जातात. असा एक मराठी अभिनेता कुंभमेळ्याला गेला आहे. आपल्याला आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिला आहे.

महाकुंभमेळ्याला भेट देणारा मराठी अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सौरभ चौगुले (Saorabh Choughule) आहे. त्याला यावर्षी कुंभमेळ्याला जाण्याचे भाग्य लाभले. त्यांनी गंगेत स्नान केल्याचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सौरभच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या खास पोस्टमधून सौरभने आपला कुंभमेळ्याचा अनुभव सांगितला आहे.

सौरभ चौगुले पोस्ट

सौरभ चौगुलेने पोस्टमध्ये एक खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "अचानक जुना मित्र कुंभला जातोय असं सांगतो काय...त्याच्या ग्रुप मधला एक मेंबर कॅन्सल होतो काय... आणि शेवटच्या क्षणाला माझं कुंभ मिळाला जायचं ठरतं काय...निव्वळ योगायोग असे म्हणतात जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही. असच काहीसं हे एक...१४४ वर्षानंतर येणाऱ्या महा कुंभमेळा..."

पुढे त्याने लिहिलं की, "असं म्हणतात, तीन पिढ्या नंतर एका पिढीला हा योग मिळतो आणि मला तो मिळाला. देवाचे खूप खूप आभार. धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं. हर हर गंगे, हर हर महादेव!" सौरभने 'जीव माझा गुंतला' मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाणशी लग्नगाठ बांधली. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT